‘एआय’च्या गैरवापरातून वाघाच्या अफवेने खळबळ (फोटो - सोशल मीडिया)
‘एआय’च्या गैरवापरातून वाघाच्या अफवेने खळबळ
वनविभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
व्हिडिओ सायबर क्राईमकडे सुपूर्द
कराड: शहरातील मुजावर कॉलनी परिसरात वाघाचा वावर असल्याचा खोटी व्हिडिओ कृत्रिम बुद्धिमत्ता (एअाय) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. ही अफवा सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सअॅपद्वारे मोठ्या प्रमाणावर पसरवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
ओमकार खंडु बोबाटे (रा. मुजावर कॉलनी, कराड) याच्याकडून हा बनावट व्हिडिओ प्रसारित झाल्याची माहिती समोर आली असून, वनविभागाने तत्काळ याची दखल घेतली. प्राप्त मोबाईल संदेशांच्या आधारे संबंधित ठिकाणी वनविभागाच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र कोणत्याही ठिकाणी वाघाचा वावर आढळून आला नाही. परिसरातील कोणत्याही नागरिकाने वाघ प्रत्यक्ष पाहिल्याचा पुरावा समोर आलेला नाही.
वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे. या व्हिडिओची तांत्रिक तपासणी करण्यासाठी तो कराड सायबर क्राईम विभागाकडे पाठविण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात अाली. यात वनक्षेत्रपाल ललिता पाटील, वनपाल आनंद जगताप, वनरक्षक अक्षय पाटील, वनरक्षक अभिजीत शेळके, आरआरटी टीमचे अजय महाडीक व रोहित कुलकर्णी यांनी सहभाग घेतला.
यहा के राजा हम है! सह्याद्रीमध्ये ‘सेनापती’ आणि ‘चंदा’चा एकत्र वावर; चांदोली वन्यजीव….
संशयास्पद संदेशांची खातरजमा करा
दरम्यान, नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या संशयास्पद व्हिडिओ किंवा संदेशांची खातरजमा केल्याशिवाय ते पुढे पाठवू नयेत, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे. कराड कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गैरवापरातून अशा प्रकारे अफवा पसरविण्याचे प्रकार वाढत असून, यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सजग राहावे, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
‘सेनापती’ आणि ‘चंदा’चा एकत्र वावर
सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये वाघांची नैसर्गिक संख्या पुन्हा स्थिर करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या ‘वाघ पुनर्स्थापना प्रकल्पा’ला मोठे यश मिळाले असून, ‘सेनापती’ हा नर वाघ आणि ताडोबा येथून स्थलांतरित करण्यात आलेली ‘चंदा’ ही वाघीण एकत्रितपणे वावरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. चांदोली वन्यजीव विभागातील आंबा वनपरिक्षेत्रात हा वावर कॅमेरा ट्रॅप आणि प्रत्यक्ष निरीक्षणातून नोंदविण्यात आला आहे.
कोयनेच्या जंगलात घुमतेय ‘बाजी’ची डरकाळी! चांदोली परिसरात सेनापती-सुभेदाराचा दबदबा
सन २०१७ मध्ये सह्याद्री व्याघ्र राखीव, भारतीय वन्यजीव संस्था देहरादून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाघ पुनर्स्थापना प्रकल्प’ हाती घेण्यात आला. सन २०२७ पर्यंत सह्याद्रीमध्ये मुक्त संचार करणाऱ्या वाघांची इष्टतम संख्या स्थापन करणे व पर्यावरणीय समतोल बळकट करणे, हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.






