दुबईकर ही भीमाशंकरच्या या लालचुटुक स्ट्रॉबेरीच्या प्रेमात पडलेत. दुबईकरांनी भीमाशंकरच्या अर्धा किलो स्ट्रॉबेरीला सहाशे रुपये मोजल्याचा दावा केला जातोय. भीमाशंकरच्या आदिवासी पट्ट्यातील पंचावन्न शेतकऱ्यांनी एकत्र येत, ही ग्रुप शेती केलीये. कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत, स्ट्रॉबेरी शेतीसाठी अनुदान ही दिलं. शेतकऱ्यांनी ही स्ट्रॉबेरी शेती करायचं ठरवलं अन आदिवासी पट्ट्यात स्ट्रॉबेरी फुलवली. शेतकऱ्यांनी गाळलेल्या घामाचा आता गोडवा चाखायला मिळतोय. भारतात तर ही स्ट्रॉबेरी पसंतीला येतेयचं पण अगदी दुबई दरबारी सुद्धा ही स्ट्रॉबेरी पोहचलीये. भीमाशंकरच्या या स्ट्रॉबेरीची भुरळ दुबईकरांना पडलीये. दुबईच्या शेख कंपनीने भीमाशंकरला स्ट्रॉबेरी शेतीला भेट देण्याचं ही ठरवलंय.