संग्रहित फोटो
तक्रारदार २३ वर्षीय असून, ते व्यवसायिक आहेत. त्यांनी १९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी २०० ब्रास माती वाहतुकीचा परवाना तहसील कार्यालय भोर येथून घेतला होता. त्यासाठी एक लाख २६ हजार २३० रुपये रॉयल्टी स्वरूपात भरले होते. तक्रारदाराच्या परवान्यातील गाड्यांमधून माती वाहतूक सुरू असताना आरोपी मंडलाधिकाऱ्यांनी ३० नोव्हेंबरला गाड्या अडवून पुढील वाहतुकीसाठी दीड लाख रुपयांची लाच मागितली. पैसे न दिल्यास वाहतूक बंद ठेवण्याचे सांगितले.
लाच मागितल्याचे निष्पन्न
सातत्याने तक्रारदाराला कार्यालयात बोलवले जात असल्याने तक्रारदाराने ३ डिसेंबर रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने त्याची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. गुरुवारी तक्रारदार यांना भोर शहराबाहेरील अभिजीत मंगल कार्यालयाजवळ भेटण्यास बोलावले. पुन्हा १ लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचण्यात आला. सायंकाळी पाचच्या सुमारास भोरेश्वर नगर रस्ता येथे लोकसेविकेने तक्रारदाराकडून एक लाख रुपयांच लाच घेताना पंचासमक्ष मंडलाच्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुहास हट्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीस निरीक्षकांसह महिला पोलीस अटकेत
गेल्या काही महिन्याखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस खात्यातील अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत ९५ हजार रुपये स्वीकारतांना धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व महिला पोलीस अंमलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल ३०६ अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षकांनी लाचेची मागणी केली होती. २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडी नंतर ९५ हजार रुपये रक्कम घेण्याचे पोलिसांनी मान्य केले होते. मात्र, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. एसीबीने धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके व एका महिला अंमलदार लोखंडे यांना ताब्यात घेतले.






