महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून जेजुरीच्या खंडोबाला ओळखलं जातं. बऱ्याच मराठी कुटुंबाचं खंडेराया कुलदैवत आहे. त्यामुळे नवविवाहित जोडपं या ठिकाणी देवाच्या दर्शनाला येतात.
लग्न झाल्यानंतर नवविवाहित जोडपं कुलदेवतेच्या दर्शनाला जातात.
हिंदू धर्मशास्त्रानुसार नवविवाहित जोडप्याने कुलदैवताचे आशीर्वाद घेणं महत्त्वाचं आहे.
लग्न झाल्यानंतर पती पत्नी जेजुरीला खंडोबाच्या दर्शनाला जातात.
जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेण्याची प्रथा फार जुनी आहे.
असं म्हटलं जातं की, खंडेराया हे भगवान शंकराचा अवतार आहेत तर आई म्हाळसाई माता पार्वतीचा अवतार आहे.
शिव आणि शक्ती म्हणजेच महादेव आणि पार्वती यांचं जसं अतूट नातं आहे. तशीच सोबत नवविवाहित पती पत्नींनादेखील मिळावी. याच कारणासाठी मराठी कुटुंबात नवविवाहित जोडपी जेजुरीच्या खंडेरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी जातात.
इन्स्टाग्रामवरील वेडींग घर या अकाउंटवरुन या प्रथेबाबत माहिती सांगितली आहे. असे मानले जाते की जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेतल्यावर संसारातले वाद, अडचणी दूर होऊन संसाराची सुरुवात आनंदी होते.
बऱ्याच कुटुंबांमध्ये परंपरेप्रमाणे गोंधळ विधी खास जेजुरीतच केला जातो.