लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भाजपने जनतेच्या निर्णयाचा स्वीकार केला आहे. भाजप नेते आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना, काँग्रेसने माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या नावाचा भावनिक वापर केल्यामुळेच हे यश मिळाल्याचा आरोप केला आहे. “जनतेने जो कौल दिला आहे तो आम्ही मान्य करतो. मात्र निवडणुकीत भावनिक मुद्द्यांचा वापर झाला. विलासराव देशमुख यांच्या नावाचा वापर करून काँग्रेसने सहानुभूती मिळवली आणि त्याचा फायदा त्यांना झाला,” असा आरोप त्यांनी केला. तरीही लातूरच्या विकासासाठी आपण कायम तत्पर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजकारण वेगळं आणि शहराचा विकास वेगळा. लातूरच्या प्रगतीसाठी मी आणि भाजप नेहमी सकारात्मक भूमिका घेऊ,” असेही त्यांनी यावेळी सांगितले. याविषयी त्यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी.