Latur Municipal Corporation: लातूर महापालिकेत काँग्रेसचा झेंडा; महापौर जयश्री सोनकांबळेंचा पदभार स्वीकार (फोटो-सोशल मिडिया)
Latur Crime News: लातूरमध्ये घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन सराईत चोरटे अटकेत
जिल्हा परिषद निवडणूक निकालाच्या अनुषंगाने माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले, “आगामी काळात राज्यात राजकीय परिस्थिती कशी राहील, हे पाहून लातूर जिल्हा परिषदेतील राजकीय निर्णय घेता येईल, जिल्हा परिषद निवडणुकीत आमची कामगिरी समाधानकारक राहील. काही ठिकाणी आम्ही कमी पडलो, हे खरे असले तरी आम्हाला गेल्या खेपेपेक्षा दुपटीने जागा मिळाल्या. आपल्या राजकीय प्रवासात आवश्यकते प्रमाणे आक्रमक भूमिका घ्यावी लागते, अशी आव्हाने पेलण्याचे आम्ही लोकनेते विलासराव देशमुख यांच्याकडून शिकलो आहोत. लातूर जिल्ह्यातील जनता काँग्रेसच्या विचारांमागे आहे. आम्ही प्रकाशित केलेल्या जाहिरनाम्याची शत-प्रतिशत अंमलबजावणी होईल, असे ठामपणे सांगून त्यांनी शेवटी लातूर महानगरपालिकेत नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र खिडकी तयार करण्यात येईल आणि नागरिकांना भ्रष्टाचाराच्या संदर्भातील तक्रारी त्या खिडकीच्या माध्यमातून दाखल करता येतील,” अशी घोषणा केली.
Latur Zilla Parishad: सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता; भाजप-राष्ट्रवादीवर आमदार अमित देशमुखांचा घणाघात
आ. अमित देशमुख यांनी काँग्रेस व वंचितचे निर्विवाद बहुमत स्थापित झाल्याबद्दल समाचान व्यक्त केले, महापौर-उपमहापौरांची कार्यकीर्द यशस्वी ठरेल, असा विश्वास व्यक्त करुन लातूरचे प्रश्न सोडविण्यासाठी ही टीम सतत कार्यरत राहील, यानिमित्ताने विकासाचा नवा अध्याय लातूर शहरात सुरू होत आहे. काँग्रेस आणि वंचितची आघाडी अभेद्य असून, जबाबदारीचे वाटप करुन वर्किंग रिलेशिय कशा पद्धतीने राहील, याच्या चर्चा सुरू होत्या. आमच्यात एकवाक्यता आहे, असे सांगितले.
या पदग्रहण सोहळ्यासह काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे सर्व नगरसेवक, दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, तब्बल नऊ वर्षांचे प्रशासकराज संपुष्टात आल्यानंतर झालेल्या या पदग्रहण समारंभामुळे लातूर पालिकेचा प्रशासकीय चेहरा बदलून मानवी चेहरा प्राप्त झाल्याचे व कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची गजबज वाढल्याचे चित्र आज दिसत होते. राजकीय वर्तुळात या शहरावर असलेली काँग्रेसची पकड अधिक घट्ट झाल्याची चर्चा सोहळ्यानंतर सुरू झाली.






