Latur Municipal Election 2026: विकासाच्या घोषणांना वाढला जोर; लातूर महानगरपालिकेची सत्ता कुणाच्या हाती? (फोटो-सोशल मीडिया)
Latur Municipal Election 2026: लातूर महानगरपालिकेच्या (Municipal corporation) निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु असून शहरातील राजकीय वातावरण तापलेल्या स्वरूपात दिसत आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप, विकासघोषणा व वचननाम्यांची चढाओढ सुरु आहे. मात्र शहरातील सत्ता नेमकी कोणाच्या हाती जाणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. सत्ताधारी पक्षातील मुख्यमंत्री, पालकमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी लातूरमध्ये सभांचे आयोजन करून विजय आपलाच असा ठाम दावा केला. त्यांनी लातूरला व्यापारी व आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्या. ज्यात लातूर-कल्याण एक्सप्रेस वे सुरू करणे, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य, गृहनिर्माण आणि नागरी सुविधा या सर्व क्षेत्रात कामे करण्याचे आश्वासन समाविष्ट आहे.
याशिवाय, काँग्रेसनेही आपला पाच गॅरंटींचा वचननामा जाहीर करून शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे, युवकांना रोजगार संधी आणि महिलांना आर्थिक पाठबळ देणे याची हमी दिली आहे. मात्र मतदार कोणाला कौल देणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. केंद्र व राज्यात एकत्र असलेले भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस मात्र महापालिकेच्या रणांगणात समोरासमोर उभे आहेत. तर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत हातमिळवणी करून रणभूमी गाजवली आहे. विकास, विश्वास व स्थानिक मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर लातूरकर मतदारांचा निर्णय शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवाऱ्यांच्या वचन नाम्यावर नागरिक स्थिर आहेत.
हेही वाचा: Sanjay Raut Live : संजय राऊत अन् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये 11 लाखांची पैज; फक्त अट एकच..!
लातूर शहरात दलित व मुस्लिम ही काँग्रेसची परंपरागत व्होट बँक समजली जाते. परंतु या मतपेढीवर यंदाच्या निवडणुकीत विभागणी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम या दोन्ही पक्षांचा काँग्रेसच्या या परंपरागत या मतपेढीवर डोळा आहे. यामुळेच काँग्रेसची गोची झाल्याचे दिसते. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरासाठी नवीन योजना जाहीर करून कोणतीही कमतरता राहणार नाही, असा विश्वास दिल्याने यात आणखी भर पडली आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






