सौजन्य - नवराष्ट्र टीम
भोर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकमध्ये भाजपाचा प्रचाराचा प्रारंभ शुक्रवारी (दि.२१) सकाळी भोरचे दैवत वाघजाई माता मंदिर येथे पूजा व श्रीफळ वाढवून झाला. यावेळी पाटील बोलत होते. यावेळी माजी आमदार संग्राम थोपटे, राजेंद्र शिळीमकर, बाळासाहेब गरुड, शेखर वढणे, जीवन कोंडे, पल्लवी फडणीस, संतोष धावले, आकाश कांबळे, दिपाली शेटे, स्वाती गांधी, नगराध्यक्ष, नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केलेले उमेदवार व नागरिक उपस्थित होते.
पाटील म्हणाले, भोरचे नागरीक सुजाण आहेत. थोपटे यांच्या घराण्याची कारकीर्द कधीही वादग्रस्त राहिली नाही. आजकालचे राजकारण हे जात, धर्मावर आधारित असून, बिहार जनतेने राजकारणात जात, धर्म न पाहता पक्ष बघून मतदान केले आहे. जनतेला पक्षाबद्दल आत्मविश्वास आहे. त्यामुळे मोदींनी पंचवीस कोटी जनतेला दारिद्ररेषेतून बाहेर काढले, राम मंदिर बांधले व देश जगाच्या इतिहासात पहिल्या क्रमांकावर कसा जाईल यासाठी प्रयत्न करत आहेत. महिलांना सक्षम, सुखी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.






