Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हे’ आहेत भारतातील 5 सर्वात लांब रेल्वे मार्ग! प्रवास इतका मोठा की दिवस कमी पडतील

दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. भारतीय रेल्वेच्या काही गाड्या अशा आहेत, ज्या खूप लांबचा प्रवास करतात. या ट्रेनचा प्रवास इतका मोठा असतो की गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी कधीकधी 3 दिवसांचा कालावधीही कमी पडतो. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 ट्रेन्सबद्दल सांगणार आहोत ज्या विकली धावतात आणि सर्वात लांब मार्ग कव्हर करतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 08, 2024 | 01:55 PM
‘हे’ आहेत भारतातील 5 सर्वात लांब रेल्वे मार्ग! प्रवास इतका मोठा की दिवस कमी पडतील
Follow Us
Close
Follow Us:

भारतात बरेच लोक दररोज ट्रेनने प्रवास करतात.ट्रेनचा प्रवास हा नोकदारांसाठी तर त्यांच्या रोजच्या जीवनाचा एक भाग लांबला आहे. हा प्रवास कधी लहान तर कधी फार मोठा असतो. काही लोकांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी 1 तास लागतो तर काहींना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी 2 ते 3 दिवसांचा प्रवास करावा लागतो. कन्याकुमारी ते काश्मीर आणि ईशान्य भारत ते दक्षिण भारताला जोडणाऱ्या गाड्यांना बराच वेळ लागतो. यापैकी अनेक गाड्या आहेत ज्या 2 ते 3 दिवस प्रवास करतात. आज आम्ही तुम्हाला भारतीय रेल्वेच्या सर्वात लांब अंतर कापणाऱ्या ट्रेनबद्दल सांगणार आहोत.

हेदेखील वाचा –  अनंत-राधिका हनिमूनसाठी थांबलेल्या आलिशान जागेचे भाडे किती? किंमत ऐकून पायाखालची जमीन सरकेल

विवेक एक्सप्रेस

भारतातील सर्वात लांब अंतर कापणाऱ्या ट्रेनमध्ये विवेक एक्सप्रेसचे नाव प्रथमस्थानी आहे. ही ट्रेन आसाममधील दिब्रुगड ते तामिळनाडूमधील कन्याकुमारी यांना जोडते आणि सुमारे 4,200 किलोमीटरचे अंतर कापते. ही ट्रेन विकली धावते आणि तिचा प्रवास पूर्ण करण्यासाठी अंदाजे 80 तास लागतात. ही ट्रेन वाटेत 50 पेक्षा जास्त वेळा थांबते. या ट्रेनमधील प्रवासादरम्यान प्रवाशांना आसामच्या हिरव्यागार चहाच्या बागांपासून ते कन्याकुमारीच्या वालुकामय समुद्रकिनाऱ्यांपर्यंतची दृश्ये पाहायला मिळतात.

हिमसागर एक्सप्रेस

हिमसागर एक्सप्रेस हीदेखील विकली ट्रेन आहे, जी तामिळनाडूमधील कन्याकुमारी ते कटरा, जम्मू आणि काश्मीरपर्यंत धावते. हे अंदाजे 3,800 किमी अंतर व्यापते, जो सर्वात लांब रेल्वे मार्ग आहे. या ट्रेनला तिचा प्रवास पूर्ण करण्यासाठी अंदाजे 73 तास 5 मिनिटे लागतात. हिमसागर एक्सप्रेस 12 राज्यांमधून जाते आणि 71 स्थानकांवर थांबते, ज्यामुळे कटरा येथील वैष्णो देवी मंदिरात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही ट्रेन सर्वोत्तम पर्याय बनते.

डिब्रूगढ़ एक्सप्रेस

लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या गाड्यांमध्ये डिब्रूगढ़ एक्स्प्रेसचे नावही समाविष्ट आहे. आसाममधील न्यू तिनसुकिया येथून सुरू होणारी आणि अंतिम स्थळी पोहोचणारी ही ट्रेन 3,547 किमी अंतर कापते. प्रवास पूर्ण करण्यासाठी हिला अंदाजे 68 तास लागतात. याच्या वाटेत एकूण 35 थांबे आहेत. दिब्रुगड एक्स्प्रेसने प्रवास करताना, प्रवासी गुवाहाटी, कोलकाता, बेंगळुरू, विशाखापट्टणम आणि विजयवाडा सारख्या शहरांमधून निसर्गरम्य प्रवासाचा आनंद घेतात.

केरल संपर्क क्रांति एक्सप्रेस

केरळ संपर्क क्रांती एक्स्प्रेस केरळमधील तिरुअनंतपुरमला पंजाबशी 3,398 किमी अंतर जोडते. या ट्रेनने गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी अंदाजे 54 तास आणि 25 मिनिटे लागतात. या ट्रेनने प्रवाशांना भारताच्या दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील भागांमधील सुंदर दृश्ये पाहता येतात.

सिलचर सुपरफास्ट एक्सप्रेस

सिलचर सुपरफास्ट एक्सप्रेस ही ट्रेन सिलचर, आसाम आणि सिकंदराबाद, तेलंगणा दरम्यान गुवाहाटी मार्गे विकली धावते. ही ट्रेन 2,875 किलोमीटरचे अंतर कापते. तसेच, त्याचा प्रवास पूर्ण करण्यासाठी या ट्रेनला एकूण 54 तास 45 मिनिटे लागतात.

 

 

 

 

 

 

Web Title: 5 longest railway lines in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2024 | 01:53 PM

Topics:  

  • india
  • Indian Railway

संबंधित बातम्या

History of Indian Budget: जेम्स विल्सनपासून निर्मला सीतारमणपर्यंत; अर्थसंकल्पाचा थक्क करणारा इतिहास जाणून घ्या एका क्लिकवर 
1

History of Indian Budget: जेम्स विल्सनपासून निर्मला सीतारमणपर्यंत; अर्थसंकल्पाचा थक्क करणारा इतिहास जाणून घ्या एका क्लिकवर 

Kia Sonet: 24.1 KMPL मायलेज, सनरूफ आणि ADAS…! किया सोनेटने ५ लाख युनिट्स विक्रीचा टप्‍पा गाठला
2

Kia Sonet: 24.1 KMPL मायलेज, सनरूफ आणि ADAS…! किया सोनेटने ५ लाख युनिट्स विक्रीचा टप्‍पा गाठला

UGC New Rules:  यूजीसीच्या नवीन नियमांमुळे दिल्लीत निदर्शने; भाजप नेत्यांचे राजीनामे, उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवटीची मागणी
3

UGC New Rules: यूजीसीच्या नवीन नियमांमुळे दिल्लीत निदर्शने; भाजप नेत्यांचे राजीनामे, उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवटीची मागणी

India EU Free Trade: भारत–EU FTA चा फायदा; ऑलिव्ह ऑइल व वनस्पती तेलांच्या किमतीत झाली मोठी घट
4

India EU Free Trade: भारत–EU FTA चा फायदा; ऑलिव्ह ऑइल व वनस्पती तेलांच्या किमतीत झाली मोठी घट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.