Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Russia Bill : अमेरिकेचा भारताला मोठा झटका? रशियाशी व्यापारावर 100 % टॅरिफची टांगती तलवार; काय होणार परिणाम?

US Russia Bill : रशियाकडून इंधन व इतर व्यापार सुरू ठेवणाऱ्या देशांवर चाबूक उगारण्यासाठी अमेरिकन संसदेत मांडण्यात आलेल्या नव्या विधेयकामुळे भारतीय उत्पादनांवर तब्बल १००% Tariff लागण्याचा धोका निर्माण झाला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 09, 2026 | 01:30 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेचा भारताला मोठा झटका?
  • रशियाशी व्यापारावर 100 % टॅरिफची टांगती तलवार
  • नेमका काय होणार परिणाम ?
US Russia Bill : अमेरिकेच्या सिनेटने रशियावर नवीन निर्बंध लादणारे विधेयक मंजूर केले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजकडे जाईल. एकदा मंजूर झाल्यावर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मंजुरीने त्याचे कायद्यात रूपांतर होईल. या विधेयकात रशियाकडून तेल आणि वायू खरेदी करणाऱ्या देशांवर मोठा टॅक्स ( US Russia Bill Impact On India ) आकारला जाईल. अशी तरतूदही आहे. पण या सगळ्यात भारताने याची भीती बाळगण्याची गरज आहे का? व्यापार तज्ज्ञ आणि परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ नेमके काय सांगतात? या सगळ्याचा नेमका काय परिणाम भारतावर होणार?

5 Star Hotels Raid: तुम्ही खाताय सडलेल्या भाज्या, शिळे मांस, खराब दूध… झगमगत्या 5-स्टार हॉटेल्सची पोलखोल! FDA चा मोठा दणका

जर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले, तर ते भारतासाठी कोणत्याही दृष्टिकोनातून चांगले ठरणार नाही. या कायद्यानुसार, अमेरिकन सरकारला केवळ कायद्यात देशांची नावे नमूद करण्याऐवजी, व्यापारविषयक माहितीच्या आधारे त्यांची ओळख पटवणे बंधनकारक असणार आहे. यामध्ये रशियन कच्च्या तेलाचे पाच सर्वात मोठे आयातदार, रशियन नैसर्गिक वायूचे पाच सर्वात मोठे आयातदार आणि रशियाच्या तेल निर्बंधांना टाळण्यास मदत करणाऱ्या पाच प्रमुख देशांचा समावेश आहे.

सिनेटने लिंडसे ग्रॅहम विधेयकाला मंजुरी दिली

परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ महेश सचदेव यांच्या म्हणण्यानुसार, सिनेटने लिंडसे ग्रॅहम विधेयकाला मंजुरी दिली आहे, ज्यानुसार रशियन तेलाच्या पाच प्रमुख आयातदारांवर १०० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कर लावण्याची तरतूद आहे. प्रतिनिधीगृहात मंजूर झाल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या संमतीने त्याचे कायद्यात रूपांतर होईल.

गेल्या वर्षी, भारतावर रशियाकडून होणाऱ्या तेल आणि वायू आयातीवर २५ टक्के अतिरिक्त शुल्क लादण्यात आले होते, मात्र सर्वोच्च न्यायालयात हा खटला हरला होता. पण, यावेळी, सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर, हे विधेयक काँग्रेसमध्ये मंजूर होत आहे, त्यामुळे त्याचे कायद्यात रूपांतर होण्यास कोणताही अडथळा नाही.

भारतावर होणार मोठा परिणाम

महेश सचदेव म्हणाले की, हे विधेयक कोणत्याही स्वरूपात आले तरी ते भारतासमोर एक आव्हान उभे करेल. अमेरिकेला होणाऱ्या भारताच्या निर्यातीला अडथळा येईल आणि अनिश्चितता निर्माण होईल. या विधेयकात लादलेल्या शुल्काच्या प्रमाणाचा भारताच्या एकूण निर्यातीवर परिणाम होईल. भारतीय निर्यातदारांना याबाबत अनिश्चिततेचा सामना करावा लागेल.

आयातदारांनाही त्याच परिस्थितीचा सामना करावा लागेल. दोघांनाही त्याचे परिणाम भोगावे लागतील. भारताच्या निर्यातीला फटका बसेल. २५ टक्के शुल्क असूनही निर्यात वाढली, पण ती वाढ कमी होती. हे भारतासाठी एक आव्हान असेल, विशेषतः अशा वेळी जेव्हा दोन्ही देशांमधील व्यापार करार अंतिम टप्प्यात आहे.

कोणत्या क्षेत्रांवर होणार सर्वाधिक परिणाम?

ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह GTRIच्या मते, जर अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर १००% शुल्क लावले, तर त्याचा भारताच्या निर्यातीवर अवलंबून असलेल्या औषधनिर्माण, अभियांत्रिकी वस्तू, रसायने, वस्त्रोद्योग आणि वाहन सुटे भाग यांसारख्या क्षेत्रांवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होईल.

अमेरिकेत निर्यात होणाऱ्या भारतीय वस्तूंवर १००% कर लावल्यास त्या अमेरिकेच्या बाजारपेठेत लक्षणीयरीत्या महाग होतील. यामुळे मागणीत घट होऊ शकते. अमेरिकन खरेदीदार इतर देशांतील पर्यायी पुरवठादारांकडे वळू शकतात. परिणामी, भारतीय निर्यातदारांना मागणी कमी होणे आणि नफ्यात घट होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Bike Taxi New Policy: आता झोमॅटो, झेप्टो अन् ॲमेझॉनवर सरकारची नजर! बाईक डिलिव्हरीसाठी लागू झाले नवे कडक नियम; काय बदलणार?

Web Title: Us russia bill against trade impact on indian export

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • America
  • Business
  • Business News
  • india
  • Marathi News
  • Russia
  • Tarrif

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
2

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
3

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
4

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.