हार्ट शेपमध्ये दिसतात जगातील ही ठिकाणे, रोमँटिक सुट्टीसाठी परफेक्ट; एकदा गेलात तर पुन्हा इथून परत येण्याची इच्छा होणार नाही
कामाच्या व्यस्त जीवनातील थोडा वेळ स्वतःसाठी काढून एक ट्रिप प्लॅन करणे उत्तम पर्याय ठरू शकते. प्रवास आपले मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते आणि कामाचा थकवाही याने दूर होतो. सध्या उन्हाळ्याचा ऋतू सुरु आहे, या ऋतूत अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करतं असतो. अशात तुम्हीही जर तुमच्या पार्टनरसह रोमँटिक आणि मोकळा वेळ घालवण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला जगातील अशा काही ठिकाणांविषयी माहिती सांगणार आहोत ज्या आपल्या सौंदर्यासाठी आणि त्यांच्या अलौकिक आक्रसाठी सुप्रसिद्ध आहेत. जगात अशी अनेक बेटे आणि तलाव आहेत जे नैसर्गिकरित्या हार्ट शेपमध्ये बनलेले आहेत. ही ठिकाणे नवजोडप्यांसाठी फिरण्यासाठीचा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही इथे आपल्या पार्टनरसह एक चांगला वेळ घालवू शकता.
भारतातील ब्लू सिटी माहिती आहे का? सूर्यास्तानंतरचे इथले अलौकिक दृश्य डोळ्यात साठवून ठेवण्यासारखे आहे
ग्रेट बॅरियर रीफ
ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमधील ग्रेट बॅरियर रीफमध्ये हृदयाच्या आकाराचा एक सुंदर खडक आहे. त्याला हार्ट रीफ म्हणतात. हे प्रवाळापासून बनलेले आहे. निळ्याशार समुद्रात हा खडक अतिशय सुंदर दिसतो. या ठिकाणी बोटीने जाता येते. एअरली बीचपासून हे ठिकाण 78 किलोमीटर अंतरावर आहे. ग्रेट बॅरियर रीफमध्ये सुमारे 3 हजार खडक आहेत. इथे तुम्ही सुंदर फोटोज क्लिक करू शकता.
क्रोएशियाचे बेट वेगळे आहे
क्रोएशिया हा युरोपमधील एक देश आहे जो त्याच्या सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. पण इथे एक खास प्रकारचे बेट आहे ज्याची नेहमीच चर्चा होते. गेल्सनजॅक नावाचे एक बेट आहे जे हृदयाच्या आकाराचे आहे. याला लव्हर आयलंड असेही म्हटले जाते. हे खूप छोटे बेट आहे. त्याचप्रमाणे फिजीमध्येही हृदयाच्या आकाराचे बेट आहे ज्याला तवरुआ असे म्हणतात. इथे एक खाजगी रिसॉर्ट आहे जो 25 एकरांवर पसरलेला आहे.
अशी सरोवरे तुम्ही कधीच पाहिली नसतील
जपानच्या होक्काइडोच्या घनदाट जंगलात टोयोनी नावाचा एक खूप जुना तलाव आहे. याचा आकारही अगदी हृदयासारखा आहे. लोक गिर्यारोहण करून इथपर्यंत पोहोचतात. आजूबाजूला उंचच उंच घनदाट झाडांमध्ये हा तलाव अतिशय सुंदर दिसतो. हे लोकांचे आवडते पिकनिक स्पॉट आहे. त्याचप्रमाणे कॅनडातही हार्ट लेक नावाचे एक सरोवर आहे जे अगदी त्याच आकाराचे आहे. लोक इथे ट्रेकिंगचा आनंद घेता येतो. हिवाळ्यात हा तलाव गोठतो. याशिवाय इटलीचे स्कॅनो लेकही खूप सुंदर आहे. हा 3 हजार वर्षे जुना तलाव आहे. इथे लोक मासेमारी आणि पोहण्याचा आनंद घेऊ शकतात.
IRCTC चे नवीन टूर पॅकेज लाँच! डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयासह अनेक बौद्ध वारशांची करता येणार सफर
भारतातही हृदयाच्या आकाराचे तलाव
भारतातील केरळमध्ये वायनाड नावाचे एक ठिकाण आहे जे एक हिल स्टेशन आहे. येथे चेंब्रा नावाचा तलाव आहे जो हृदयाच्या आकाराचा आहे. अनेक स्थानिक लोक येथे भेट देण्यासाठी येतात. सप्टेंबर ते मार्च दरम्यान येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. हा तलाव कधीच आटत नाही. या तलावाभोवती अनेक धबधबे आहेत जे तुमची सुट्टी संस्मरणीय बनवतील. प्री वेडिंग शूटसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.