(फोटो सौजन्य:Pinterest)
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (IRCTC) पश्चिम विभागाने एक विशेष टूर पॅकेज लाँच केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित प्रमुख ठिकाणे आणि बौद्ध वारसा असलेल्या ठिकाणांची पर्यटकांना सफर घडवून आणण्यासाठी यात काही खास ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. ही सहल भारत गौरव टूरिस्ट ट्रेनद्वारे पार पाडली जाणार आहे.
भारतातील ‘या’ ५ मंदिरात विशेष नवरात्र पूजा, वेगवेगळ्या कारणाने प्रसिद्ध; एकदा जरूर दर्शन करा
किती दिवसांचा टूर पॅकेज आहे?
ही ट्रिप ८ रात्र आणि ९ दिवसांची असणार आहे. यामध्ये पर्यटकांना फार कमी दरात बौद्ध वारसा स्थळांची सफर करता येणार आहे. २९ एप्रिल ते ६ मे दरम्यान ही सहल आहे. दरम्यान आयआरसीटीसी ही भारतीय रेल्वेची मिनी रत्न सार्वजनिक क्षेत्रातील एक शाखा आहे. याद्वारे प्रवाशांना फार कमी दारात सुंदर ठिकाणांना भेट देता येते.
प्रवाशांना पॅकेजमध्ये मिळणार अनेक सोई-सुविधा
आयआरसीटीसी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रात २५ वर्षांपासून अस्तित्वात आहे. रेल्वे मंत्रालयाचे भारत गौरव धोरण देशभरात किफायतशीर आणि परवडणाऱ्या टूरसाठी रेल्वेवरील परवडणाऱ्या अनुभवात्मक पर्यटनाचे विशेष नियोजन आयआरसीटीसी करते. या सहलीमध्ये प्रवाशांना प्रवास भाड्यासह सर्व सोई-सुविधा पुरविण्यात येणार आहेत. भारत गौरव टूरिस्ट ट्रेन १४ कोचची असून त्यात स्लीपर क्लासचे ७ कोच असणार आहे. तसेच एसी श्री, टू टायरची देखील सुविधा आहे. या ट्रेनने एकुण ६६२ प्रवासी प्रवास करु शकतात.
विविध ठिकाणी देता येणार भेटी
नागपूर वर्धा पुलगाव बडनेरा अकोला जळगाव नाशिक कल्याण मार्गे ही ट्रेन धावणार आहे. नागपूर-पुणे (दापोडी विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय), मुंबई (राजगृह दादर / चैत्यभूमी /सिद्धार्थ महाविद्यालय), मह, दिल्ली (डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, इंडिया गेट, लोटस टेंपल, कुतुबमिनार), नागपूर (दीक्षाभूमी/नागालोका) या ठिकाणांना भेट देण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ट्रेनमध्ये अत्याधुनिक पॅन्ट्री कार उपकरणे, सीसीटीव्ही आणि पॅसेंजर डिक्लरेशन सिस्टीम आहे.
तुम्ही भारतातील लंडन पाहिले आहे का? फक्त 5000 रुपयांत करा हनिमूनची प्लॅनिंग
हॉटेल-जेवणाची सुविधा पुरवली जाईल
धर्मशाळा किवा हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे जेवण, चहा-कॉफी आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था यात करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे यात, जेवण जैन पद्धतीचे असणार आहे. तसेच पर्यटकांना पर्यटनस्थळी जाण्यासाठी एसी वाहनांची व्यवस्था असेल. अधिक माहितीसाठी लोक आयआरसीटीसीच्या अधिकृत वेब साइटला भेट देऊ शकता.