(फोटो सौजन्य:Pinterest)
आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा एका ठिकाणाविषयी माहिती सांगत आहोत, ज्याला ‘ब्लू सिटी ऑफ इंडिया’ असे म्हटले जाते. या शहराची खासियत म्हणजे हे शहर सूर्यास्तानंतर निळ्या रंगांच्या भिंतींनी उजळून उठते. हे सौंदर्य पाहून जणू आकाशच या शहराला आपल्या रंगात रंगवण्यासाठी आले आहे, असे वाटू लागते. इथले सौंदर्य पाहून तुम्हालाही एका वेगळ्या दुनियेत झाल्याचा भास होऊ लागेल. स्वप्नवत वाटणारे हे ठिकाण नक्की कुठे वसले आहे, चला ते सविस्तर जाणून घेऊया.
IRCTC चे नवीन टूर पॅकेज लाँच! डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयासह अनेक बौद्ध वारशांची करता येणार सफर
कुठे आहे भारतातील ब्लु सिटी
राजस्थानच्या मध्यभागी वसलेले जोधपूर शहराला भारताचे ‘ब्लू सिटी’ म्हटले जाते. हे शहर केवळ ऐतिहासिक वारसा आणि राजेशाही भव्यतेसाठीच नव्हे तर त्याच्या अद्वितीय वास्तुकला आणि निळ्या रंगाच्या घरांसाठी देखील ओळखले जाते. तुम्ही जोधपूरच्या अरुंद रस्त्यांवरून चालत असाल तेव्हा तुम्हाला आजूबाजूला निळ्या रंगाची घरे दिसतील, ज्यामुळे ते इतर भारतीय शहरांपेक्षा हे शहर काहीसे वेगळे वाटू लागते. विशेष म्हणजे इथल्या घरांचा निळा रंग कोणत्याही एका रस्त्यावर किंवा परिसरापुरता मर्यादित नसून संपूर्ण शहर निळ्या रंगात रंगलेलं दिसते.
काय आहे या जागेची खासियत
असे म्हणतात की पूर्वी जोधपूरमधील ब्राह्मण समाजातील लोक आपली घरे निळ्या रंगात रंगवत असत, जेणेकरून ते इतर जातींपेक्षा वेगळे ओळखता येतील. हळूहळू ही परंपरा संपूर्ण शहरात पसरली आणि आता जवळपास संपूर्ण जुने जोधपूर निळ्या रंगात रंगलेले आहे. राजस्थान हे उष्ण राज्य असून जोधपूरमध्ये तीव्र उष्णता जाणवते. निळा रंग सूर्याची किरणे परावर्तित करतो आणि घरे थंड ठेवतो असे मानले जाते. याच कारणास्तव येथील लोकांना आपल्या घरांना निळा रंग लावणे पसंत पडते.
जुन्या समजुतीनुसार, डास आणि इतर कीटकांना घरापासून दूर ठेवण्यासाठी भिंतींवर निळ्या रंगाचा वापर केला जात असे. त्यामुळे ही परंपरा अधिक दृढ झाली. जोधपूरचा संबंध राजस्थानच्या राजघराण्यांशी आहे. येथे अनेक भव्य किल्ले, राजवाडे आणि ऐतिहासिक वास्तू आहेत, जे याला भव्य स्वरूप देतात. निळा रंग या शहराची राजेशाही ओळख आणखीनच खास बनवतो. जर तुम्ही जोधपूरला भेटायला गेलात तर इथल्या सूर्यास्ताचा अनुभव घ्यायलाच हवा. जसजसा सूर्य मावळतो, जोधपूरच्या निळ्या भिंती आणखीनच उजळत जातात.
मेहरानगड किल्ल्यावरून संपूर्ण शहर निळ्याशार समुद्रासारखे दिसते आणि हे दृश्य इतके विलक्षण आहे की ते पाहण्यासाठी जगभरातून लोक येथे येतात. जेव्हा सूर्यास्ताची केशरी किरणे या निळ्या भिंतींवर आदळतात तेव्हा संपूर्ण शहर जादुई दिसते. जणू शहराने स्वतःला निळ्या चादरीत गुंडाळले आहे आणि या सोनेरी प्रकाशात तिचे सौंदर्य चारपटीने वाढले आहे.
तुम्ही भारतातील लंडन पाहिले आहे का? फक्त 5000 रुपयांत करा हनिमूनची प्लॅनिंग
मेहरानगड किल्ला
जोधपूरला जात असाल तर तुम्ही इथल्या मेहरानगड किल्ल्याला भेट देऊ शकता. हा किल्ला जोधपूरच्या सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक वारशांपैकी एक आहे. उंच टेकडीवर वसलेल्या या किल्ल्यावरून संपूर्ण शहराचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्याची जाड भिंती आणि भव्य बांधकाम त्याचा शाही वारसा दर्शवते.
उम्मेद भवन पॅलेस
उम्मेद भवन पॅलेस जगातील सर्वात भव्य राजवाड्यांमध्ये गणला जातो. हे केवळ आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध नाही तर आता ते फाय स्टार हॉटेल आणि म्युसियमच्या रूपातही काम करते.
सदर बाजार
तुम्हाला जोधपूरला जाऊन इथल्या पारंपारिक गोष्टी खरेदी करायची असेल, तर सदर बाजार तुमच्यासाठी एक सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे तुम्हाला राजस्थानी हस्तकला, कपडे, दागिने आणि मसाले मिळतील.
मंडोरे गार्डन
हिरवळ आणि ऐतिहासिक वास्तूंचा संगम पाहायचा असेल तर मंडोरे गार्डनला नक्की भेट द्या. हे ठिकाण जोधपूरच्या इतिहासाशी जोडले गेले आहे. हे इथल्या इतिहासासंबंधित अनेक कथा सांगते.