नवरात्रीचा उत्सव संपूर्ण देशभरात मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू झालेल्या नवरात्रीची सांगता नवमी तिथीला होईल. या सणानिमित्त दुर्गा देवीची मनोभावानेने पूजा केली जाते. नवरात्रीच्या नऊ दिवस देवीची पूजा करण्याची प्रथा आहे. आज आम्ही तुम्हाला देशातील एका अनोख्या देवीच्या मंदिराबाबत काही अद्भुत गोष्टी सांगणार आहोत. मंदिराची खासियत म्हणजे, या मंदिरात देवी पिंडीच्या रूपात विराजमान आहे. या पिंडीतून सतत पाणी वाहत असते, काय आहे यामागील रहस्य? चला या लेखातून जाणून घेऊयात.
भारतातील कानपुर जिल्ह्यातील घाटमपूर येथे देवी कुष्मांडाचे मंदिर स्थित आहे. हे मंदिर या ठिकाणचे सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय मंदिर आहे. येथील देवीला कुळा देवी असेही म्हटले जाते. इथे देवी विश्रांती मुद्रेत आहे. दरवर्षी नवरात्रीत मोठी जत्राही भरते. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – Navratri Travel: भारतातील एकमेव मंदिर जिथे आहेत देवीची नऊ रूपं, इच्छापूर्तीसाठी प्रसिद्ध
कुष्मांडा देवीची ही मूर्ती फार जुनी आणि प्राचीन आहे. देवी कुष्मांडा मंदिराबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. एका प्रचलित पौराणिक कथेनुसार, भगवान शंकर देवी सतीचे शरीर घेऊन फिरत होते, तेव्हा भगवान विष्णूने आपल्या चक्राने माता सतीच्या शरीराचे अनेक भाग केले होते. हे भाग जिथे पडले तिथे तिथे शक्तीपीठे निर्माण झाली आहेत. या ठिकाणी सती देवीचा अंशही पडल्याचे सांगितले जाते.
या मंदिरात कुष्मांडा देवी पिंडाच्या रूपात विराजमान आहे. मुख्य म्हणजे, या पिंडीतून नेहमीच पाणी वाहत राहते. याबाबत असे मानले जाते की, मंदिरात अर्पण केलेले पाणी अनेक दुःख दूर करते. यासोबतच हे पाणी डोळ्यांना लावल्याने दृष्टीही वाढते.
हेदेखील वाचा – Navratri Travel: देवीचे अनोखे शक्तीपीठ जिथे देवी सतीचे पडले होते शीर, या नवरात्रीत एकदा नक्की भेट द्या
1783 मध्ये कवी उमेदराव खरे यांनी लिहिलेल्या पर्शियन पुस्तकानुसार 1380 मध्ये राजा घटम देव यांनी येथे देवीचे दर्शन घेतले आणि त्यांच्या नावावर घाटमपूर हे नगर वसवले. यानंतर हे मंदिराचा पुन्हा 1890 मध्ये चंदीदीन यांनी जीर्णोद्धार केला. नंतर पुढे जाऊन येथे राहणाऱ्या भक्तांनी या जागी मठाची स्थापना केली.
कुष्मांडा देवीचे हे मंदिर कानपुर येथे स्थित आहे. येथे जाण्यासाठी तुम्ही ट्रेन, बसचा पर्याय निवडू शकता. तुम्ही कानपूर किंवा झकरकाटी बस स्टँडवरून नौबस्ताला थेट टॅक्सी किंवा ऑटो घेऊ शकता. तेथून व्हॅन, टॅक्सी आणि बसने थेट घाटमपूरला जात येते. या मंदिरात कुष्मांडा देवीव्यतिरिक्त राम, सीता आणि लक्ष्मण यांची मूर्ती स्थित आहे. तसेच इथे हनुमानाचीही एक मोठी मूर्ती स्थित आहे.