Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vatican library: या ठिकाणी आहेत तब्बल 10 लाख पुस्तके, पण प्रवेश मिळणं कठीण! काय आहे कारण

वेटिकन लायब्ररी रोम शहरातील कॅथलिक चर्चमध्ये स्थित आहे. या लायब्ररीमध्ये 10 लाखांहून अधिक पुस्तकं आणि इतर लायब्ररी साहित्यांचा संग्रह आहे. ही जगातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या लायब्ररींपैकी एक आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 06, 2025 | 10:06 AM
Vatican library: या ठिकाणी आहेत तब्बल 10 लाख पुस्तके, पण प्रवेश मिळणं कठीण! काय आहे कारण

Vatican library: या ठिकाणी आहेत तब्बल 10 लाख पुस्तके, पण प्रवेश मिळणं कठीण! काय आहे कारण

Follow Us
Follow Us:

जगात लाखो लायब्ररी आहेत. आपल्या कॉलेज आणि शाळेत देखील लायब्ररी असते, ज्यामध्ये शेकडो पुस्तकं असतात. पण जगात अशा अनेक लायब्ररी आहेत, ज्या शेकडो वर्षे जुन्या आहेत आणि त्यांचा इतिहास देखील अगदी मनोरंजक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका लायब्ररीबद्दल सांगणार आहोत. या लायब्ररीचं नाव आहे वेटिकन लायब्ररी. वेटिकन लायब्ररी ही जगातील सर्वात जुन्या लायब्ररींपैकी एक आहे. या लायब्ररीचा इतिहास अतिशय मजेदार आहे.

समुद्री इतिहास आणि सांस्कृतिक वारशाचा साक्षीदार आहे भारतातील 204 लाईटहाऊस! सुंदरता अशी की पाहतच राहाल

खरं तर या लायब्ररीमध्ये लाखो पुस्तकं आहेत, जी वेगवेगळ्या विषयांशी संबंधित आहेत. त्यामुळे या लायब्ररीला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक जातात. मात्र या लायब्ररीमध्ये प्रवेश मिळण कठिण आहे. या लाखो पुस्तकांच्या जगात सामान्य पर्यटक जाऊ शकत नाहीत. याचं कारण काय आहे आणि या जगातील सर्वात जुन्या लायब्ररींपैकी एक असलेल्या वेटिकन लायब्ररीचा इतिहास काय आहे, याबद्दल जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – pinterest)

वेटिकन लायब्ररी कुठे आहे?

वेटिकन लायब्ररी रोम शहरातील कॅथलिक चर्चमध्ये स्थित आहे. ही जगातील सर्वात जुन्या लायब्ररींपैकी एक आहे. असं सांगितलं जात की, 1475 मध्ये अधिकृतपणे वेटिकन लायब्ररीची स्थापना करण्यात आली. या वेटिकन लायब्ररीचा इतिहास शेकडो वर्षे जुना आहे. गेल्या 600 वर्षांमध्ये या वेटिकन लायब्ररीमध्ये अनेक गोष्टींचा संग्रह करण्यात आला आहे. पूर्वीच्या काळात वेटिकन लायब्ररीला वेटिकन सीक्रेट आर्काइव या नावाने देखील ओळखलं जात होतं.

10 लाखांहून अधिक पुस्तके आणि हस्तलिखिते

वेटिकन लायब्ररी ही एक अद्भुत आणि ऐतिहासिक जागा आहे, जी वेटिकन सिटीमध्ये स्थित आहे. वेटिकन लायब्ररी जगातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या लायब्ररींपैकी एक आहे. या लायब्ररीमध्ये 10 लाखांहून अधिक पुस्तकं आणि इतर लायब्ररी साहित्यांचा संग्रह आहे. वेटिकन लायब्ररी केवळ एक महत्त्वाचे पुस्तक संग्रहालय नाही, तर एक महत्त्वपूर्ण शोध केंद्र देखील आहे. जगभरातून विद्वान आणि संशोधक वेटिकन लायब्ररीमध्ये येतात आणि या ठिकाणी असणाऱ्या साहित्य संग्रहाचा अभ्यास करतात.

वेटिकन लायब्ररीचा इतिहास 15 व्या शतकात सुरु होतो. पोप निकोलस पंचमने याची स्थापना केली होती. त्यावेळी लायब्ररीमध्ये केवळ 2,000 पुस्तके होती. मात्र काळानुसार वेटिकन लायब्ररीच्या संग्राहात भर पडत गेली आणि आज ही जगातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या लायब्ररींपैकी एक आहे.

सर्वांना आत जाण्याची परवानगी नाही

ही जगातील अशी एकमेव लायब्ररी आहे, जिथे सर्वांना आत जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. विशेष परवानगी असलेले लोकचं वेटिकन लायब्ररीमध्ये प्रवेश करू शकतात. विद्वान, रिसर्चर, यूनिवर्सिटी प्रोफेसर यांसारखे लोक वेटिकन लायब्ररीमध्ये प्रवेश करू शकतात. मात्र यासाठी त्यांना विशेष परवानगी घ्यावी लागते. परवानगीशिवाय वेटिकन लायब्ररीमध्ये कोणीही प्रवेश करू शकत नाही.

हे आहेत जगातील सर्वात जुने बाजार! माशांपासून कपड्यांपर्यंत येथे सर्व काही मिळणार

असं सांगितलं जातं की, वेटिकन लायब्ररीमध्ये फार जुन्या साहित्यांचा संग्रह आहे. त्यामुळे या ठिकाणी सामान्य लोकांना प्रवेश करण्याची परवानगी नाही. वेटिकन लायब्ररीमध्ये सिक्रेट लिटरेचर आहे, असं देखील सांगितलं जात.

Web Title: There are 10 lakh books in the vatican library know the history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 10:06 AM

Topics:  

  • travel news

संबंधित बातम्या

Travel Name : दिल्लीतील जंतर मंतर का आहे खास? येथील 4 स्तंभांचे रहस्य जाणून घ्या
1

Travel Name : दिल्लीतील जंतर मंतर का आहे खास? येथील 4 स्तंभांचे रहस्य जाणून घ्या

Sapt Badri Yatra : तुम्ही पाहिले आहेत का उत्तराखंडमधील सप्तबद्री? अशी प्लॅन करा यात्रा
2

Sapt Badri Yatra : तुम्ही पाहिले आहेत का उत्तराखंडमधील सप्तबद्री? अशी प्लॅन करा यात्रा

Travel News : दोन लोकांच्या बाली ट्रिपसाठी किती खर्च येईल? ट्रिपचा खर्च आणि सर्व तपशील जाणून घ्या
3

Travel News : दोन लोकांच्या बाली ट्रिपसाठी किती खर्च येईल? ट्रिपचा खर्च आणि सर्व तपशील जाणून घ्या

रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या
4

रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.