१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला आणि संपूर्ण देश ब्रिटिशमुक्त झाले, परंतु स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतरही भारतात एक ठिकाण असे आहे जिथे आजही ब्रिटिशांची हुकूमत आहे. हे वाचून जरी तुम्हाला आश्चर्य वाटत असले तरी हे सत्य आहे.
kohoma
नागालँडची राजधानी कोहिमा येथील कोहिमा युद्ध स्मारक ही ती जागा आहे. भारताच्या अधिकारात असूनही नसलेली ही जागा जगभरात कोहिमा वॉर सिमेट्री, युद्ध स्मारक म्हणून प्रसिद्ध आहे. दुसऱ्या महायुद्धात चिंडविन नदी काठी जपानी सेना आणि आझाद हिंद फौजेने केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या २७०० ब्रिटीश जवानांच्या कबरी येथे आहेत. महायुद्धात कामी आलेल्या ब्रिटीश सैनिकांच्या अश्या कबरी जगात जेथे जेथे ब्रिटीश सत्ता होती अश्या ठिकाणी आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया, कॅनडाचाही समावेश आहे. या स्थानांची जबाबदारी कॉमनवेल्थ वॉर ग्रेव कमिशन कडे आहे.
‘येथे येणाऱ्या पर्यटकांची पहिली नजर एका शिळेवर पडते. त्यावर लिहिलेल्या मजकुराने कुणाचेही डोळे पाणावतात. ‘ जेव्हा तुम्ही तुमच्या घरी जाल तेव्हा आमच्याविषयी सांगा. तुमच्या भविष्यासाठी आम्ही आमचे वर्तमान कुर्बान केले आहे.’ अश्या ओळी असलेली ही शिळा कोहिमा शहिदांना खरी श्रद्धांजली आहे.