कारने Long Trip ला जाण्याचा प्लॅन करताय? या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर कराल पश्चाताप
ट्रेनच्या गर्दीतून प्रवास करण्यापेक्षा अनेकजण कारने प्रवास करण्याला अधिक महत्त्व देतात. कारण ट्रेनने गर्दीतून प्रवास करण्यापेक्षा कारने आपल्या प्रियजनांसोबत प्रवास करणं सर्वांनाच आवडतं. शिवाय कारने प्रवास करताना आपण सुंदर निसर्गदृष्याचा आनंद घेत आपला प्रवास एन्जॉय करू शकतो. खरं तर आपल्या आवडत्या व्यक्ति आणि निसर्गाच्या सानिध्यात कार ट्रीपचा आनंद दुप्पट होतो. आपल्या कारने आपल्या आवडत्या व्यक्तिसोबत फिरायला जाणं, हे अनेकांचं स्वप्न असतं. तुम्ही देखील तुमच्या कारने Long Trip ला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर त्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
गोवा आणि शिमल्याला विसरून जाल, अवघ्या अडीच तासात करता येईल Qatar चा प्रवास! ही आहेत प्रमुख ठिकाणं
कारने प्रवास करणं जेवढ आनंददायक आहे, तेवढच धोकादायक देखील आहे. कारण रस्त्यात कार बंद पडली किंवा काही इतर समस्या निर्माण झाली तर आपल्याला त्याची तयारी आधीपासूनच करणं गरेजचं आहे. यासाठी आता आम्ही तुमच्यासोबत काही टीप्स शेअर करणार आहोत, ज्याच्या मदतीने तुमचा कारचा प्रवास सुखाचा होऊ शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
तुमच्या कारची तपासणी करा: प्रवासाला निघण्यापूर्वी तुमच्या कारची तपासणी करा आणि काही दुरुस्तीची कामं असतील तर ती पूर्ण करा. अनेकदा असं घडतं की आपल्याला वाटतं समस्या छोटी आहे, पण प्रवासादरम्यान याच समस्येमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो.
इंधन आणि तेल: तुमच्या कारमध्ये आवश्यकतेनुसार इंधन आणि तेल असल्याची खात्री करा. प्रवासाला निघण्यापूर्वी पेट्रोल पंपावर जाऊन कारमध्ये फ्यूल भरा. कारण प्रवासादरम्यान तुमच्या कारमधील इंधन आणि तेल संपलं तर तुम्हाला समस्यांचा सामना कराला लागू शकतो.
स्पेयर पार्ट्स: तुमच्या कारचे स्पेयर पार्ट्स जसे की टायर, बॅटरी इत्यादींची योग्य प्रकारे तपासणी करा, ज्यामुळे प्रवासात तुम्हाला कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत.
डॉक्युमेंट : कारने प्रवासाला जाण्याचा प्लॅन करत असाल तर त्यापूर्वी तुमचे डॉक्युमेंट्स म्हणजेच ड्राइविंग लाइसेंस, वाहन नोंदणी इत्यादी कागदपत्रे सोबत असल्याची खात्री करा.
सुरक्षा: प्रवासादरम्यान तुमची आणि तुमच्यासोबत असलेल्या इतर प्रवाशांची सुरक्षा लक्षात घ्या आणि कार सुरु करण्यापूर्वी सीटबेल्ट लावा.
नेविगेशन: तुमच्या निश्चित स्थळी पोहोचण्यासाठी नेविगेशनचा वापर करा.
इंधन आणि जेवण: प्रवासादरम्यान तुमच्या कारमध्ये आवश्यकतेनुसार इंधन आणि तेल असल्याची खात्री करा. तसेच निघताना जेवणाची देखील व्यवस्था करा.
आराम: सतत कार चालवल्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो, अशावेळी गाडी रस्त्याच्या कडेला लावून थोडा वेळ आराम करा.
कार ब्रेकडाउन: जर तुमची कार खराब झाली तर ताबडतोब मेकॅनिकला कॉल करा. नाहीतर तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी उशीर होऊ शकतो.
हवामान आणि आजार: तुम्हाला किंवा तुमच्यासोबत असलेल्या इतर प्रवाशांना दुखापत किंवा आजार असल्यास, ताबडतोब डॉक्टरांना कॉल करा. हवामान खराब झाल्यास, ट्रिप रद्द करा आणि सुरक्षित ठिकाणी जा. कारण खराब हवामान असताना गाडी चालवणे धोकादायक ठरू शकतं.