Snowfall पाहण्यासाठी Nainital ची ट्रीप प्लॅन करताय? या 5 ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका, मजा होईल दुप्पट
आपल्या जोडीदारासोबत किंवा कुटूंबियांसोबत हिवाळ्यात फिरायला जाण्याची मजाच वेगळी असते. हिवाळ्यात तुम्ही थंडीचा अनुभव घेत, वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेत तुमचा प्रवास एन्जॉय करू शकता. हिवाळ्यात प्रवास करण्याची एक वेगळीच मजा असते आणि आपल्या देशात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे हिवाळ्यात प्रवासाची मजा द्विगुणित होते. नैनिताल हे यापैकी एक ठिकाण आहे.
Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या शॉपिंगसाठी बेस्ट आहेत दिल्लीचे हे बाजार, जाणून घ्या
तुम्ही हिवाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर नैनिताल तुमच्यासाठी बेस्ट ठिकाण ठरू शकतं. या ठिकाणी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत, जोडीदारासोबत किंवा कुटूंबियासोबत भेट देऊ शकता. नैनिताल हे सुंदर शहर तलाव, हिरवळ आणि सुंदर दृश्यांसाठी ओळखले जाते. उत्तराखंडच्या टेकड्यांवर वसलेले हे शहर हिवाळ्यात आणखी सुंदर आणि आकर्षक दिसतं. विशेषतः बर्फवृष्टीनंतर हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी दिसत नाही. त्यामुळे अनेकजण हिवाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी नैनितालची ट्रीप प्लॅन करतात. तुम्ही देखील यंदाच्या हिवाळी सुट्टीत नैनितालला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आता आम्ही तुम्हाला नैनितालमधील काही अशी ठिकाणं सांगणार आहोत, जी एक्सप्लोअर केल्यानंतर तुमच्या प्रवासाचा आनंद दुप्पट होईल. (फोटो सौजन्य – Pinterest)
नैनीतालच्या आकर्षणाचे केंद्र नैनी तलाव आहे, जे हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेले आहे. हे तलाव चंद्रकोर आकाराचे आहे. हे तलाव भगवान शिव यांच्या पत्नीच्या डोळ्यांपैकी एक असल्याचे मानले जाते. मॉल रोडजवळील या तलावावर बोटिंगचा आनंद लुटता येतो किंवा पायी चालतच पर्वतांची अप्रतिम दृश्ये पाहता येतात.
नैनितालपासून सुमारे 10 किमी अंतरावर असलेले खुर्पाताल हे एक शांत आणि सुंदर तलाव आहे, जे देवदार आणि ओकच्या जंगलांनी वेढलेले आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार या तलावाचा रंग ऋतुमानानुसार बदलतो. हे ठिकाण निसर्ग सहल, पक्षी निरीक्षण आणि मासेमारीसाठी योग्य आहे.
स्नो व्ह्यू पॉइंट हे या शहरातील एक लोकप्रिय ठिकाण आहे, जिथे केबल कार किंवा ट्रेकिंगच्या मदतीने पोहोचता येते. इथून तुम्हाला नैनिताल शहराचे सुंदर नजारे तर दिसतातच, पण इथून हिमालय पर्वतही पाहायला मिळतात. या ठिकाणी एक छोटेसे मंदिर देखील आहे, जिथे तुम्ही माँ दुर्गा, राम-लक्ष्मण-सीता आणि महादेवाचे दर्शन घेऊ शकता.
देवी सतीला समर्पित हे मंदिर 51 शक्तीपीठांपैकी एक आहे. हे मंदिर नैनी तलावाच्या काठावर वसलेले आहे आणि ते त्याच्या पारंपारिक कुमाऊनी वास्तुकला आणि तलावाच्या विहंगम दृश्यांसाठी ओळखले जाते. शांत वातावरणामुळे हे एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र असल्याचे सिद्ध होते.
Vatican library: या ठिकाणी आहेत तब्बल 10 लाख पुस्तके, पण प्रवेश मिळणं कठीण! काय आहे कारण
जवळपास प्रत्येक हिल स्टेशनवर तुम्हाला मॉल रोड सापडतील. ही अशा शहरांची शान आहे, ज्यामुळे त्यांचे सौंदर्य वाढते. नैनिताल त्याच्या सुंदर मॉल रोडसाठी देखील ओळखले जाते. तुम्हाला अनेक दुकाने, कॅफे आणि रेस्टॉरंट्स पाहायला मिळतील. हे नैनितालचे हृदय आहे, जिथे तुम्ही भरपूर खरेदी करू शकता आणि चविष्ट पदार्थ खाऊ शकता.