Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Year Celebration: न्यू ईयर सेल‍िब्रेशनसाठी प्रत्येक वेळी गोव्यालाच का जायचं? भारतातील हे 5 बीचही आहेत परफेक्ट

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्याला प्रचंड गर्दी असते. अशावेळी तुम्ही इतर ठिकाणी नवीन वर्ष साजरं करण्याचं प्लॅनिंग करू शकता. यासाठी तुम्ही भारतातील 5 बीचची निवड करू शकता, जे सुंदर आहेत आणि जिथे पार्टीचा आनंद घेता येईल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 09, 2024 | 10:03 AM
New Year Celebration: न्यू ईयर सेल‍िब्रेशनसाठी प्रत्येक वेळी गोव्यालाच का जायचं? भारतातील हे 5 बीचही आहेत परफेक्ट

New Year Celebration: न्यू ईयर सेल‍िब्रेशनसाठी प्रत्येक वेळी गोव्यालाच का जायचं? भारतातील हे 5 बीचही आहेत परफेक्ट

Follow Us
Close
Follow Us:

येत्या काही दिवसांतच 2024 वर्ष संपणार आहे. सरत्या वर्षाचा निरोप घेण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी लोकांनी अनेक प्लॅन तयार करण्यास सुरुवात केली आहे. नवीन वर्षाची सुरुवात कशी करायची आहे, यासाठी लोकांचं नियोजन सुरु झालं आहे. नवीन वर्षांचं स्वागत म्हटलं तर अनेकजण गोव्याला जाण्याचा प्लॅन करतात. कारण गोव्यामधील नवीन वर्षाच्या स्वागताची पार्टी खूप प्रसिध्द आहे. येथील बीचवर लोक खूप एन्जॉय करतात. गोव्याचा बीच नवीन वर्षाच्या पार्टीसाठी योग्य आहे. अनेकांनी येथे नववर्ष साजरे करण्याचे बेतही आखले आहेत. पण दरवर्षी नवीन वर्षांचं स्वागत करण्यासाठी गोव्यालाच का जायचं?

Travel Guide: मोठ्या खर्चामुळे प्रवासाची आवड पूर्ण होत नाहीये? हे मनी सेविंग हॅक्स तुम्हाला करतील मदत

नववर्षाला येथे एवढी गर्दी असते की, पाय ठेवायलाही जागा नसते. फ्लाइटपासून हॉटेलपर्यंतच्या खोल्यांचे दर प्रचंड वाढलेले असतात. अशा परिस्थितीत आपला प्रचंड खर्च होतो. पण आता आम्ही तुम्हाला भारतातील अशा काही समुद्रकिनाऱ्यांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही नवीन वर्षाची पार्टी करू शकता. इथे तुम्ही कुटुंब, मित्र, प्रेयसी कोणासोबतही जाऊ शकता. (फोटो सौजन्य – pinterest)

गोकर्ण, कर्नाटक

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कर्नाटकातील गोकर्ण हे एक परिपूर्ण ठिकाण आहे. हे ठिकाण शांतता आणि सौंदर्यासाठी ओळखले जाते. येथे तुम्ही ओम बीच, कुडले बीच आणि हाफ मून बीचवर नवीन वर्षाची पार्टी साजरी करू शकता. येथील सौंदर्य तुमची नवीन वर्षाची पार्टी अविस्मरणीय बनवेल. येथे तुम्हाला फोटो क्लिक करण्यासाठी एक चांगले दृश्य देखील मिळेल. तुम्ही येथे सेल्फी, ग्रुप फोटो घेऊ शकता.

राधानगर बीच, अंदमान्र

अंदमानच्या राधानगर बीचची गणना आशियातील सर्वात मोठ्या समुद्रकिनाऱ्यांमध्ये केली जाते. नवीन वर्षाचा आनंद लुटण्यासाठी येथे पांढरे वाळवंट, स्वच्छ पाणी आणि हिरवळ अशा अनेक गोष्टी आहेत. यामुळे तुमची नवीन वर्षाची पार्टी अधिक मजेदार होणार आहे. इथे गर्दी खूप कमी दिसेल. नवीन वर्षात तुम्ही येथे अनेक वॉटर स्‍पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता.

कन्याकुमारी बीच, तामिळनाडू

कन्याकुमारी बीचवर अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर एकत्र येतात. नवीन वर्षात तुम्ही येथे सूर्योदय आणि सूर्यास्ताचे सुंदर दृश्य पाहू शकता. दरवर्षी येथे नववर्ष साजरे करण्यासाठी लोकांची गर्दी असते. हे ठिकाण इतके सुंदर आहे की तुम्ही इथल्या सौंदर्यात हरवून जाल.

मांडवी बीच, गुजरात

तुम्हाला तुमचं नवीन वर्ष एखाद्या शांत ठिकाणी साजरं करायचं असेल तर तुमच्यासाठी गुजरातचा मांडवी बीच हे योग्य ठिकाण आहे. येथे तुम्ही उंट सवारीचा आनंद घेऊ शकता. सूर्यास्ताचा सुंदर नजारा बघायला मिळतो. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे.

मैत्रिणीसाठी बॅचलर पार्टी प्लॅन करताय? तुमच्या बकेट लिस्टमध्ये आत्ताच अ‍ॅड करा ही बजेट फ्रेंडली डेस्टिनेशन

चेराई बीच, केरळ

केरळच्या चेराई बीचला पर्यटकांची पहिली पसंती आहे. नववर्ष साजरे करण्यासाठी निसर्गप्रेमी येथे जाऊ शकतात. इथे समुद्राच्या लाटा तुम्हाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात. तुम्ही गोव्यापासून दूर एखादे वेगळे ठिकाण शोधत असाल तर हा बीच सर्वोत्तम असेल.

Web Title: Travel news know about top five beaches of india where you can celebrate new year party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 10:03 AM

Topics:  

  • New Year
  • travel news

संबंधित बातम्या

100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…
1

100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील
2

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा
3

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा

कॉफी, साऊथ इंडियन पदार्थांसह भारतीय एअरपोर्टवर प्रवासी ‘हे’ पदार्थ खाणे अधिक पसंत करतात
4

कॉफी, साऊथ इंडियन पदार्थांसह भारतीय एअरपोर्टवर प्रवासी ‘हे’ पदार्थ खाणे अधिक पसंत करतात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.