Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध्य प्रदेशातील या चार ठिकाणी दिसला ‘सरकटे का आतंक’! एक्सप्लोर करताच मिळेल थ्रिलिंग अनुभव

किर्तीपाल महाराजांनी शत्रूंपासून संरक्षणासाठी चंद्रगिरी टेकडीच्या सर्वात उंचावर चंदेरी किल्ला बांधला होता. एका रात्रीत एका व्यक्तीने डोंगर कापून काटी व्हॅली गेटवे तयार केला, अशा कथा आजही सांगितल्या जातात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 11, 2024 | 11:54 AM
मध्य प्रदेशातील या चार ठिकाणी दिसला 'सरकटे का आतंक'! एक्सप्लोर करताच मिळेल थ्रिलिंग अनुभव

मध्य प्रदेशातील या चार ठिकाणी दिसला 'सरकटे का आतंक'! एक्सप्लोर करताच मिळेल थ्रिलिंग अनुभव

Follow Us
Close
Follow Us:

तुम्हाला थ्रिलिंग अनुभवासह नवीन ठिकाणे एक्सप्लोर करायला आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अलिकडेच कॉमेडी हॉरर चित्रपट ‘स्त्री 2’ ने बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालत लोकांचं प्रचंड मनोरंजन केलं. या चित्रपटाल दाखवण्यात आलेल्या ठिकाणांबद्दल लोकांमध्ये अजूनही प्रचंड क्रेझ आहे. ही ठिकाणं मध्य प्रदेश आणि भोपाळमधील आहेत. चित्रपटातील या शहरांचे सौंदर्य पाहून लोक अजूनही या ठिकाणांना भेट देत आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन 3 महिने उलटले असले तरी चित्रपटात दाखवण्यात आलेल्या ठिकाणांबद्दलची लोकांची उत्सुकता कायम आहे. (फोटो सौजन्य – सोशल मिडीया)

हेदेखील वाचा- मनाली जवळ लपली आहेत ही 4 ऑफबीट डेस्टिनेशन! निसर्गासोबत निवांत क्षण घालवण्याचा आनंद घ्या

राजा राणी महाल, चंदेरी

चंदेरी येथील राजा राणी महल हे चित्रपटाचे एक महत्त्वाचे शूटिंग लोकेशन आहे. हा सात मजली राजवाडा चित्रपटात अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. खासकरून या चित्रपटातील प्रसिद्ध रोमँटिक गाणे ‘तुम्हारे ही रहेंगे’ या पॅलेसमध्ये शूट करण्यात आले आहे. या राजवाड्याच्या पायऱ्या हे या चित्रपटाचे शूटिंगचे महत्त्वाचे ठिकाण होते. तुम्ही चंदेरीला जाऊन या महालाला स्वतः भेट देऊ शकता. या ठिकाणी भेट देऊन तुम्ही हॉरर आणि थ्रिलिंग अनुभव घेऊ शकता.

चंदेरी किल्ला, चंदेरी

चंदेरी शहराची शान असलेला चंदेरी किल्लाही चित्रपटात अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. 10व्या-11व्या शतकात बांधलेला हा किल्ला चंद्रगिरी नावाच्या टेकडीवर बांधला गेला आहे. किर्तीपाल महाराजांनी शत्रूंपासून संरक्षणासाठी चंद्रगिरी टेकडीच्या सर्वात उंचावर हा किल्ला बांधला होता. हा किल्ला स्थापत्यकलेचा एक भव्य नमुना आहे, जो मोठ्या प्रमाणात भयावह अनुभव देखील देतो.

हेदेखील वाचा- या फेस्टिव्ह सिजनला एक्सप्लोर करा श्रीलंकातील हे सुंदर 5 बीच, समुद्राकिनारी घ्या सनसेटचा आनंद

काटी व्हॅली गेटवे, चंदेरी

चित्रपटात अनेक ठिकाणे दाखवण्यात आली असली तरी त्यात दाखवलेला बस स्टँड प्रत्येकाच्या लक्षात असेल जिथे चित्रपटातील अभिनेत्री श्रद्धा कपूरला सोडण्यासाठी विकी प्रत्येक वेळी जातो. या दृश्यात दिसणारा मोठा दरवाजा म्हणजे चंदेरीचा काटी व्हॅली गेटवे. हा दरवाजा प्रत्यक्षात पछाडलेला मानला जातो आणि त्याच्याशी संबंधित अनेक रहस्ये आज अस्तित्वात आहेत. विशेष म्हणजे एका रात्रीत एका व्यक्तीने डोंगर कापून हा दरवाजा बांधला, अशा कथा आजही सांगितल्या जातात. डोंगर कापून हा दरवाजा बांधला गेल्याने त्याला काटी व्हॅली गेटवे म्हणतात.

ताजमहाल पॅलेस, भोपाळ

चंदेरीतील सुंदर आणि भीतीदायक ठिकाणांव्यतिरिक्त राज्याची राजधानी भोपाळची काही दृश्येही या चित्रपटात दाखवण्यात आली. चित्रपटाची काही दृश्ये भोपाळमधील ताजमहाल पॅलेसमध्ये शूट करण्यात आली आहेत. मनोरंजक गोष्ट अशी आहे की या ऐतिहासिक राजवाड्याशी संबंधित अनेक भीतीदायक कथा आहेत.

तुम्हाला थ्रिलिंग अनुभव घेत नवीन ठिकाणं एक्सप्लोर करण्याची आवड असेल तर तुम्ही राजा राणी महाल, चंदेरी किल्ला, काटी व्हॅली गेटवे आणि ताजमहाल पॅलेस या ठिकाणांना भेट देऊ शकता. हि सर्व ठिकाणे दिसायला जेवढी सुंदर आहेत, तेवढी भयानक देखील आहेत.

Web Title: You can explore four exciting places in madhya pradesh where you will get thrilling experience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 10:44 AM

Topics:  

  • Marathi News
  • travel news

संबंधित बातम्या

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर
1

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव
2

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने
3

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध
4

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.