मनाली जवळ लपली आहेत ही 4 ऑफबीट डेस्टिनेशन! निसर्गासोबत निवांत क्षण घालवण्याचा आनंद घ्या
मनाली प्रत्येक पर्यटकाच्या बकेट लिस्टमध्ये आहे. अनेकजण शांत वातावरण आणि निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी मनालीला भेट देतात. पण अनेदका पर्यटकांच्या गर्दीमध्ये मनाली गजबजून जातं. त्यामुळे अनेकांना शांत वातावरणाचा आनंद घेता येत नाही. परंतु यावेळी जर तुम्ही गर्दीपासून दूर शांत आणि सुंदर ठिकाणे शोधत असाल, तर मनालीच्या आजूबाजूला लपलेली ही 4 ठिकाणे तुमच्यासाठी योग्य आहेत. होय, या ठिकाणांना भेट देऊन तुम्ही हिमाचलचे सौंदर्य जवळून पाहू शकता. तसेच तुम्ही निसर्गाच्या कुशीत निवांत क्षण घालवू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
हेदेखील वाचा- दिवाळीच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ठरतील दिल्लीतील ही ठिकाणं, कमी पैशात करा भरपूर शॉपिंग
मनाली आपल्या सौंदर्यासाठी देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. पण यावेळी तुम्हाला गर्दीपासून दूर शांत ठिकाणी निसर्गाच्या कुशीत निवांत क्षण घालवायचे आहेत का? जर होय, तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. वास्तविक, मनालीच्या आजूबाजूला अशी अनेक लपलेली ठिकाणे आहेत जिथून तुम्हाला संपूर्ण हिमाचल प्रदेशचे सौंदर्य पाहता येते. अशाच 4 ऑफबीट डेस्टिनेशनबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
डोंगर दरीत वसलेले मलाना गाव हिमाचल प्रदेशातील सर्वात सुंदर आणि शांत ठिकाणांपैकी एक आहे. मनालीच्या गजबजाटापासून दूर निसर्गाच्या कुशीत थोडा वेळ घालवायचा असेल तर मलाना हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. हे गाव प्राचीन संस्कृती आणि सुंदर नैसर्गिक दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. मनालीहून रस्त्याने तुम्ही मलानाला सुमारे 2 तासात पोहोचू शकता. येथे तुम्हाला शांत वातावरण, स्वच्छ हवा आणि टेकड्यांचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळतील.
ऋतू कोणताही असो, आजकाल मनालीमध्ये पर्यटकांची वाढती गर्दी ही नवीन गोष्ट नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या मोसमात शांत आणि निवांत ठिकाण शोधत असाल तर मनालीपासून सुमारे 190 किलोमीटर अंतरावर असलेले ठाणेदार हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ठाणेदार हे डोंगर आणि हिरवाईने वेढलेले एक छोटेसे गाव आहे, जिथे तुम्ही निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकता आणि शांतता जवळून अनुभवू शकता.
हेदेखील वाचा- या फेस्टिव्ह सिजनला एक्सप्लोर करा श्रीलंकातील हे सुंदर 5 बीच, समुद्राकिनारी घ्या सनसेटचा आनंद
मनालीच्या गजबजाटापासून दूर हिमाचल प्रदेशाच्या कुशीत वसलेला, पटलिकुहल हा एक खजिना आहे. मनालीपासून अवघ्या 27 मिनिटांच्या अंतरावर असलेले हे शांत आणि सुंदर ठिकाण निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग आहे. पटलिकुहल हे हिमाचल प्रदेशातील अशा ऑफबीट ठिकाणांपैकी एक आहे जे अद्याप बहुतेक पर्यटकांनी शोधलेले नाही. तुम्हालाही गर्दीपासून दूर शांततापूर्ण वातावरणात काही वेळ घालवायचा असेल तर पटलिकुहल हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
मनालीपासून अवघ्या 28 किलोमीटर अंतरावर वसलेले सजला गाव हे एक सुंदर ठिकाण आहे, जिथे निसर्गाच्या कुशीत वसलेला धबधबा आणि प्रसिद्ध विष्णू मंदिर आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल, तर मनाली ते सजला हा मार्ग तुमच्यासाठी एक रोमांचक अनुभव घेऊन येईल. या गावात जाण्यासाठी घनदाट जंगलातून जाणे हा प्रत्येकासाठी अविस्मरणीय प्रवास असू शकतो.