अहिल्यानगर शहरातील सहा नामांकित डॉक्टरांविरुद्ध तब्बल ५ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाने तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणूक, कटकारस्थान आणि रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. साध्या घशाच्या त्रासासाठी दाखल झालेल्या ७९ वर्षीय वृद्धाला, कोरोना पॉझिटिव्ह नसतानाही खोटे रिपोर्ट बनवून, चुकीचे उपचार देऊन मारल्याचा आणि नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा आरोप फिर्यादी अशोक खोकराळे यांनी केला आहे. डॉ. गोपाळ बहुरुपी, डॉ. सुधीर बोरकर, डॉ. सचिन पांडुळे, डॉ. अक्षयदीप झावरे, डॉ. मुकुंद तांदळे आणि लॅबचे तज्ज्ञ यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे. डॉक्टर फरार असल्याने, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी तात्काळ अटकेची व जलद तपासाची मागणी केली आहे. त्यांनी संबंधित डॉक्टरांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १११ लावावे, तसेच मनपा आयुक्तांना रुग्णालयांची चौकशी करण्याची विनंती केली आहे. या घटनेमुळे कोरोना काळातील हलगर्जीपणा प्रकरणात डॉक्टरांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.