काशिमिरा परिसरातील घटनेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या आणि एमआयएम नेते वारीस पठाण यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या या भेटीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “बाहेरून येणाऱ्या नेत्यांच्या भडकाऊ वक्तव्यांमुळे मीरा-भाईंदरचे शांत वातावरण बिघडते,” असे सरनाईक म्हणाले. त्यांनी स्पष्ट चेतावणी दिली की, “मीरा-भाईंदर हे कोणाच्याही राजकीय प्रयोगासाठी प्रयोगशाळा नाही.” तसेच, शहराचे वातावरण दूषित करणाऱ्या नेत्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.