भाजपचे सावंतवाडी माजी शहराध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारणी सदस्य अजय गोंदावले यांनी पक्षाला रामराम ठोकत आज शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान गोंदावले शिवसेनेत आल्यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे. त्यांच्याकडे दातृत्व आणि नेतृत्व असल्यामुळे निश्चितच त्याचा फायदा येणाऱ्या काळात होणार आहे. त्यामुळे त्यांचा पक्षात योग्य तो सन्मान केला जाईल, असा विश्वास जिल्हाप्रमुख संजू परब यांनी यावेळी व्यक्त केला. येथील आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी “दीपक केसरकर तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है..!!”, अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी गोंदावले व संजू परब यांना पाठिंबा दिला.