नको बारामती, नको भानामती असे फलक लावून पिंपरी चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांनी अजित पवारांना कडाडून विरोध केला होता पण आता ती खदखद पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने उफाळून आलीये. प्रचारादरम्यान अजित पवार यांनी महेश लांडगेना पिंपरी चिंचवड मधला ‘भ्रष्टाचाराचा आका’ म्हटलं होतं. यानंतर पिंपरीगावात आमदार लांडगे यांनी जाहीर सभा घेत पवार यांना एकेरी भाषेत प्रत्युत्तर दिलं. पुढे हा वाद इतका टोकाला गेला की मुख्यमंत्र्यांना हा राजकीय वाद आवरण्यासाठी सार्वजनिक व्यासपीठावरून मध्ये पडावं लागलं ! एकमेकांचा कार्यक्रम करण्याइतपत टोकाला गेलेल्या या वादामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेसोबतच पुणे जिल्ह्याचंही राजकीय वातावरण कसं फिरू शकतं, पाहूयात या व्हिडिओमधून.