आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपा दक्षिण रायगड जिल्हातर्फे लोकशाही संरक्षण दिन समारंभाचे आयोजन आलिबागमध्ये करण्यात आले. या वेळी आणीबाणीतील बंदीवानांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख वक्त्या आमदार चित्रा वाघ यांनी राहुल गांधींवर टीका करत, “ज्यांनी संविधान पायदळी तुडवलं त्यांच्या वंशजांकडून आज देशात अराजकता निर्माण केली जात आहे,” असे वक्तव्य केले. कार्यक्रमाला खासदार धैर्यशील पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.