अलिबाग : राज्य महामार्ग असो किंवा राष्ट्रीय महामार्ग खड्यांच्या समस्या दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहेत. अलिबागपासून वडखळ रस्ता केवळ 22 किमीचा. 22 किमीचा राष्ट्रीय महामार्ग (क्र.166ओ) अत्यंत दुरवस्थेत असून लाखो खड्डे, उंचवटे, वाकडे-तिकडे वळणं यामुळे प्रवास जीवघेणा बनला आहे. या रस्त्यामुळे वाहनधारक व प्रवाशांना शारीरिक, मानसिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करून खड्डेमुक्त करण्यात यावा, अशी मागणी निलेश शरद पाटील यांनी कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेण तसेच रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात पिंपळभाट, राऊतवाडी–वाडगांव फाटा, खंडाळा–तळवली (मारुती मंदिर), मैनूशेटचा वाडा, तीनवीरा गेस्ट हाऊस–जोशी वडेवाले–चरी फाटा, पेझारी पोलीस चौकी–पेझारी–पोयनाड–पांडबादेवी आदी प्रमुख भागातील रस्ते अतिशय खराब स्थितीत असल्याचे नमूद केले आहे.
निवेदन मिळाल्यानंतर संबधित अधिकाऱ्यांनी उद्या पासून खड्डे भरण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. मात्र, जर काम त्वरित सुरू झाले नाही तर अलिबाग–पेण रस्ता संघर्ष समिती तीव्र आंदोलन करणार असून संबंधित कार्यालयास टाळे लावण्याचा इशारा देण्यात आला आहे.आज झालेल्या आंदोलनात माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अँड.मानसी म्हात्रे ,अँड.प्रवीण ठाकूर निलेश दादा पाटील, दिलीप जोग ,सुरेश घरत, शैलेश चव्हाण,सचिन राऊळ,आकाश राणे,निखिल मयेकर,विक्रांत वार्ड , विकास पिंपळे,अँड.रत्नाकर पाटील,आमोद मुंडे,प्रमोद घासे, चेतन कवळे,योगेश पाटील,राजू विश्वकर्मा, संदीप गायकवाड,व इतर नागरिक उपस्थित होते.
संघर्ष समितीने स्पष्ट केले आहे की, सरकार व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे जनतेचा सहनशक्तीचा बांध फुटला असून रस्ता दुरुस्ती तात्काळ सुरू झाली नाही तर पुढील काही दिवसांत मोठे आंदोलन उभारले जाणार आहे.आजच्या आंदोलनात मा.नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अँड.मानसी म्हात्रे ,अँड.प्रवीण ठाकूर निलेश दादा पाटील, दिलीप जोग ,सुरेश घरत, शैलेश चव्हाण,सचिन राऊळ,आकाश राणे,निखिल मयेकर,विक्रांत वार्ड , विकास पिंपळे,अँड.रत्नाकर पाटील,आमोद मुंडे,प्रमोद घासे, चेतन कवळे,योगेश पाटील,राजू विश्वकर्मा, संदीप गायकवाड,व इतर नागरिक उपस्थित होते.