विविध कारणाने राज्यभरात दिवसाला तेरा शेतकरी आत्महत्या करत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे, ही दुर्दैवी बाब असून, शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून त्याचबरोबर त्यांच्या नावाने एक मंडळ स्थापन करून त्याद्वारे विविध शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबवल्या जाणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिली आहेत.हर्षवर्धन सपकाळ काय बोलतात याला मी महत्त्व देत नाही.कृषिमंत्री चांगला पत्त्याचा खेळ खेळतात त्यामुळे त्यांना क्रीडा खात देण्यात आलं, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली, त्यावर हर्षवर्धन सपकाळ विरोधक आहेत आणि ते असे बोलले नाहीत तर त्यांचे कोणी ऐकणार नाही, त्यामुळे ते टीका करतात.परंतु ते काय बोलतात याला मी फारसे महत्त्व देत नाही, असं वक्तव्य पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केलं आहे.