चोपडा तालुक्यातील यावर्षी मोठ्या प्रमाणावर तुरीची पेरणी शेतकऱ्यांनी केली होती पेरणी पासून काढणीपर्यंत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खर्च लागलेला आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने निंदणीसाठी तसेच तण नाशक फवारणी देखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर केली आहे. सध्या तूर कापणी व काढणी सुरू असल्याने मजुराच्या साह्याने कापणी व गोळा करून यंत्रणाच्या साह्याने काढली केली जात आहे. तुर कापण्या पासून गोळा करण्यापर्यंत शंभर ते दीडशे मजूर लागले. आता यंत्रणाच्या सहाय्याने सहाशे रुपये पोतं याप्रमाणे काढणी सुरू आहे. गेल्यावर्षी तुरीला नऊ ते दहा हजार पर्यंत भाव होता. यावर्षी तुरीचा भाव सात हजार पर्यंत असल्याने शेतकरी चिंतेत सापडलेला आहे. लागलेला खर्च निघेल परंतु नफा निघणार नाही असे तुर उत्पादकांचं म्हणणं आहे.