कर्जत तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांबाबत पोलीस मित्र संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शासनाला आंदोलनाबद्दल नोटीसा दिल्यानंतर देखील बांधकाम विभागाच्या कोणत्याही कार्यालयाने हे आंदोलन गांभीर्याने घेतलेले नाही. त्यामुळे आज पासून कर्जत श्रीराम पूल येथे पोलीस मित्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदम यांनी आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान नजिकच्या काळात आलेला गणेशोत्सव लक्षात घेऊन खड्डे भरण्याची मागणी केली होती, ती मागणी मान्य झाली नसल्याने रस्त्यावरील खड्ड्यात गणपती बाप्पाची मूर्ती सोबत घेऊन बसण्याचे आंदोलन सुरू झाले आहे.