पावसाळ्यात अतिवृष्टी झाली की नेहमीच कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा सामना करावा लागतो आहे. मात्र यंदा तर पावसाळा सुरू व्हायच्या पूर्वीच मान्सूनपूर्व अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आणि धरण क्षेत्रात गेल्या दहा दिवसापासून मान्सूनपूर्व पावसानं अक्षरशः थैमान घातलं आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या उन्हाळी पिकांची पूर्णपणे नासाडी झाली आहे. विशेषतः भात ,भुईमूग, मका पिकांच मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासच पावसानं हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.शिवाय खरिपाच्या पेरण्याही लांबणीवर पडल्या आहेत..तर पन्हाळा तालुक्यात नदीकाठची जमीन खचल्याने कृषीपंप वाहून गेल्याचं समोर आलं आहे.करवीर तालुक्यातील महे गावात जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी गुढघाभर पाण्यातच पिकांची कापणी सुरू केली आहे.दरम्यान पन्हाळा , राधानगरी , करवीर तालुक्यासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने शेतात पाणीचपाणी झाल्याने उन्हाळी पिकं रानात अक्षरशः सडल्याचं हदयद्रावक चित्र आहे..त्यामुळे सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता नुकसान ग्रस्त शेतकरी करत आहेत.