Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Accident News: हृदयद्रावक! घरावर नारळाचं झाड कोसळून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. घरासमोर असलेले वाळलेले नारळाचे झाड अचानक घरावर कोसळले. छताचा पत्रा फोडून झाडाचा बुंधा झोपलेल्या 10 वर्षीय आयुषच्या अंगावर पडला. गंभीर जखमी झालेल्या आयुषचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 25, 2026 | 03:05 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कागलमधील सिद्धनेर्ली येथे घरावर नारळाचे झाड कोसळले.
  • झाडाखाली दबून 10 वर्षीय आयुषचा मृत्यू झाला.
  • कागल पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली.
कोल्हापूर: कोल्हापूर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरासमोर वाळलेलं नारळाचं झाड अचानकपणे घरावर कोसळलं आणि छतावरील पत्रा फोडून 10 वर्षीय मुलाच्या अंगावर पडला. यामुळे मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घडलेली घटना कोल्हापुरातील कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली गावात घडली.

काय घडलं नेमकं?

मृत्यू झालेल्या मुलाचा नाव आयुष (वय 10) असे आहे. लेखन दादू सकट यांच्या घरासमोर एक नारळाचं झाड सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घरावर कोसळलं. यावेळी घरात आयुष, आई काजल आणि वडील अक्षय चौगुले हे झोपले होते. त्याचदरम्यान नारळाचं खोड थेट घरावर कोसळलं. घराचा पत्रा फुटून झाड झोपलेल्या आयुषच्या अंगावर कोसळलं.

दौंड नगरपरिषदेत खळबळ! महिला अधिकाऱ्याचा विनयभंग; नेमकं काय घडलं?

या आयुष गंभीर जखमी झाला. त्याच्या नाका- तोंडातून रक्तस्त्राव होऊ लागला होता. ग्रामस्थांनी त्याला तातडीने कागल ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचार सुरु करण्यापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आयुष हा त्याचा एकुलता एक मुलगा होता. आयुष्य हा इयत्ता चौथीत शिक्षण घेत होता. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून कागल पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद नोंदवण्यात आली.

सोशल मीडियावरून ओळख, लॉजवर नेऊन अत्याचार; व्हिडिओ व्हायरलची धमकी देत तरुणीला ब्लॅकमेल

 कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २१ वर्षीय तरुणीला सोशल मीडियावर मैत्री करणं महागात पडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील पीडित तरुणीची सोशल मीडियावर एका तरुणासोबत मैत्री झाली. त्यांनतर त्याने या मुलीला भेटायला बोलावले. त्याने तिला लॉजवर नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

या प्रकरणातील पीडित तरुणी ही 21 वर्षांची असून गडहिंग्लजची आहे. ती खासगी नौकरी करते. तर या प्रकरणातील आरोपीचे नाव गणेश खोत असे आहे. तो पन्हाळा तालुक्यातील अभियांत्रिकी पदवीचं शिक्षण घेत आहे. सोशल मीडियावरून दोघांची ओळख झाली आणि गणेश याने तरुणीला कोल्हापुरात भेटायला बोलावले. त्यांनतर पन्हाळा येथील लॉजवर नेत तिच्यावर अत्याचार केला.

Ketan Agarwal Muder Case: लोहगड हत्याकांडाचा थरारक खुलासा; 3 प्लॅन, ‘डेथ पॉईंट’ आणि सिग्नल मिळताच चेतनने…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली येथे घडली.

  • Que: मृत मुलाचे नाव आणि वय काय होते?

    Ans: मृत मुलाचे नाव आयुष असून तो 10 वर्षांचा होता.

  • Que: आयुषचा मृत्यू कसा झाला?

    Ans: घरावर नारळाचे झाड कोसळून झाडाचा बुंधा अंगावर पडल्याने आयुषचा मृत्यू झाला.

Web Title: Kolhapur accident news heart wrenching 10 year old boy dies after coconut tree collapses onto house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • crime
  • kolhapur
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

कोल्हापुरात धक्कादायक प्रकार; अडीच कोटी दिल्यानंतरही पैशांची मागणी, दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न
1

कोल्हापुरात धक्कादायक प्रकार; अडीच कोटी दिल्यानंतरही पैशांची मागणी, दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

Kolhapur : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर नवरात्रासाठी सज्ज; स्वच्छता मोहिमेला सुरुवात
2

Kolhapur : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर नवरात्रासाठी सज्ज; स्वच्छता मोहिमेला सुरुवात

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
3

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
4

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.