लाखो भाविकांचं श्रद्धा स्थान असलेल्या कोल्हापुरातील दख्खनचा जोतिबा डोंगरावर चोपडाई देवीच्या श्रावण षष्ठी यात्रेत तब्बल 400 किलो वजनाचा भेसळयुक्त पेढा, बर्फी आणि हलवा जप्त करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने ही मोठी कारवाई केली आहे.दरम्यान वारंवार जोतिबा डोंगरावर भेसळयुक्त पेढे सापडत असल्याने भक्तांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं यावरून सिद्ध होत आहे.सांगली जिल्ह्यातील डफळापुर इथल्या उत्तम शिंदे यांच्याकडून खरेदी केलेला पेढा, बर्फी आणि हलवा सदाशिव वारेकर गणेश वारेकर पोपट वाडेकर आणि फारुख वझरवाट यांनी श्रावण षष्ठी यात्रेनिमित्त विक्रीसाठी आणला होता. त्या मालाची विक्री शंभर रुपये पाव किलो प्रमाणे सुरू होती.यावेळी जोतिबा डोंगरावरील माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांना हा माल भेसळुकत असल्याचा संशय आला, त्यांनी तात्काळ अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाला यासंदर्भात माहिती दिली.त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने हा माल जप्त करून तपासणी केल्याने हा सर्व माल भेसळयुक्त असल्याचे स्पष्ट झालं आहे. दरम्यान या पदार्थांचे नमुने अन्न आणि औषध प्रशासनाने पुढील तपासणीसाठी पाठवले असून उर्वरित भेसळयुक्त पेढे आणि बर्फीचा मुद्देमाल ट्रॉलीने भरून डम्पिंग ग्राउंड मध्ये टाकण्यात आला आहे.