मराठवाड्यासह महाराष्ट्रातील दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालं असून, शेतकऱ्यांसमोर आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा गंभीर प्रश्न निर्माण झालायशेतीसाठी दोन लाख रुपये खर्च करूनही हातात अवघे पाच ते दहा हजार रुपयांचं उत्पन्न येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत व्याजाने घेतलेलं कर्ज फेडायचं कसं आणि पुढचे आठ महिने काढायचे कसे, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. कापूस आणि तुरीला अपेक्षित उत्पादन मिळालेलं नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. केवळ पंचनामे आणि कागदपत्रांची प्रक्रिया न करता सरकारने सरसकट मदत जाहीर करावी, अशी आर्त मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.