
फोटो सौजन्य सोशल मिडिया
Maharashtra Farmers News : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर बोलले आहेत, महाराष्ट्र शासनाने दुष्काळ आणि पिकांच्या नुकसानीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कठीण काळात शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची कर्ज किंवा इतर वसुली न करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
आम्ही या बाबत ताबडतोब डीडीआर यांना सुचना दिल्या आहेत, हा काळ शेतकऱ्यांसाठी कठीण काळ आहे. दुष्काळाच्या अडचणीच्या काळात कोणीही वसुली करू नये, कोणी करत असेल तर त्यांच्यावर शासनाच्या वतीने कारवाई केली जाईल असे स्पष्ट भूमिका कृषी मंत्री दत्तात्रय बरणे यांनी घेतली आहे. आॅक्टोबर महिना चालू असून पाऊस जून महिन्या पर्यंत आहे. पण शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट असून शासन शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर मदत पोहचवेल यासाठी प्रयत्नशील असेल असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.
राज्यातील शेतकरी सध्या दुष्काळ आणि पिकांच्या नुकसानीमुळे मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा कठीण काळ असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटणाले आहेत.
भाजपचा पैसा फेक, तमाशा देख’चा अहंकार उतरवा; हर्षवर्धन सपकाळ यांचे शिक्षक-पदवीधरांना आवाहन
कृषीमंत्री मंत्री दत्तात्रय बरणे यांनी जिल्हा उपनिबंधक (DDR)यांना तातडीने या संदर्भात सूचना दिल्या असून दुष्काळाच्या कठीण काळात जर कोणीही शेतकऱ्यांकडे जबरदस्तीने वसुली करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर शासनाच्या वतीने कायदेशीर कारवाई केली जाईल ; असा ईशारा कृषीमंत्री मंत्री दत्तात्रय बरणे यांनी दिला आहे.
81 टक्के पंचनाम्याची कामे झाली असून 1 कोटी 50 लाख एवढ्या हेक्टकचे काम झाले आहेत. येणाऱ्या 4 ते 5 दिवसात कामे होतील.पिक विमा असेल कृषी विभाग आणि जल संधारण विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असे आश्वासन कृषी मंत्री मंत्री दत्तात्रय बरणे यांनी दिले.