मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसमोर बंडखोरीचे आव्हान उभे राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीकडून कालच ठाकरेसेनेचे उमेदवार दिलीप घुगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे आता महाविकास आघाडीतही उमेदवारीवरून चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, दिलीप घुगे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील, असा विश्वास प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर ठाकरे गटाशी चर्चा सुरू असून निश्चितच त्यांचा उमेदवार अर्ज मागे घेईल, अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील उमेदवारीचा अंतिम निर्णय काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.