फॅशन विश्वातील आघाडीचं नाव म्हणजे मनिष मल्होत्रा. बॉलीवूड हॉलीवूड सिलेब्रिटी तसंच अनेक मोठ्या दिग्गजांच्या कपडे मनिषने डिझाइन केले आहेत. अशातच आता त्याने डिझाइन केलेली आणि अभिनेत्री काजोल देवगण हिने परिधान केलेली गोल्डन साडीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
(फोटो सौजन्य - मनीष मल्होत्रा इन्स्टाग्राम)
काजोलने नेसलेल्या या साडीला सोनेरी रंगाची आकर्षक अशी बॉर्डर आहे.
या गोल्डन साडीवर पारंपरिक ज्वेलरी आणि लो बन हेअरस्टाइल केलेली काजोल अत्यंत मोहक दिसत आहे.
या साडीचं वैशिष्ट्यं म्हणजे यावर हाताने केलेला बारकाईचा भरतकाम होतं.
अभिनेत्री काजोलने नेसलेल्या साडीच्या बॉर्डरवर भरजरी काम करण्यात आलं आहे.
मनीष मल्होत्राने डिझाईन केलेली सोनेरी रंगाच्या साडीमुळे अभिनेत्रीचा राजेशाही लूक दिसत आहे.