• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Congress Has Demanded That A New Party Office Be Built At Nariman Point

नरीमन पाईंटलाच पक्षाला नवीन कार्यालय बांधून द्या, अन्यथा…; काँग्रेसचा इशारा

नरीमन पाईंट येथील पूर्वीच्याच जागी काँग्रेस पक्षाला कार्यालय बांधून द्यावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 13, 2025 | 05:08 PM
नागपुरात निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये वाद; माजी मंत्री सुनील केदारांना आव्हान

नागपुरात निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये वाद; माजी मंत्री सुनील केदारांना आव्हान (संग्रहित फोटो)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : काँग्रेस पक्षासह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच जागी काँग्रेस पक्षासह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात ठेवून मेट्रो कार्पोरेशने ही जागा परस्पर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला विकली आहे. हा व्यवहार रद्द करून नरीमन पाईंट येथील पूर्वीच्याच जागी काँग्रेस पक्षाला कार्यालय बांधून द्यावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

टिळक भवन येथील पत्रकार परिषदेत बोलताना सचिन सावंत पुढे म्हणाले की, मंत्रालयासमोर नरीमन पाईंट येथे काँग्रेस पक्षाचे गांधी भवन हे कार्यालय तसेच राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांची कार्यालये अनेक वर्षांपासून होती. मुंबई मेट्रो टप्पा- ३ चे काम पूर्ण झाल्यानंतर फ्री प्रेस जर्नल मार्गावरील त्याच जागेत नव्याने कार्यालयीन इमारतीचे बांधकाम करून राजकीय पक्षांना MMRDA आणि MMRC यांनी कार्यालये देण्याची आवश्यक ती कार्यवाही करावी असा शासन आदेश २१ ऑक्टोबर २०१५ रोजी काढण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मेट्रोच्या कामासाठी तात्पुरत्या स्वरुपात कार्यालय हस्तांतरीत करावे असे पत्र दिनांक २ डिसेंबर २०१६ रोजी काँग्रेस पक्षाला दिले होते. आता मात्र मेट्रो कार्पोरेशन व सरकारने त्यांनी दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला आहे. काँग्रेस पक्षाशी कोणतीही चर्चा न करता ही जागा परस्पर रिझर्व्ह बँकेला ३४०० कोटी रुपयांना विकण्यात आली आहे. ५ सप्टेंबर रोजी या व्यवहाराचे रजिस्ट्रेशनही करण्यात आले आहे.

काँग्रेस पक्षासह सर्व राजकीय पक्षांना कार्यालये बांधून देणार असल्याच्या आश्वासनाची माहिती मेट्रो कार्पोरेशनने रिझर्व्ह बँकेला न देऊन त्यांचीही फसवणूक केली आहे. जमीन अधिग्रहण प्रकरणात सरकार जर राजकीय पक्षांची अशी फसवणूक करत असेल तर सामान्य माणसाच्या जमीन अधिग्रहणात किती फसवणूक करत असेल म्हणून जनतेचा अशा प्रकरणाच्या जमीन अधिग्रहणावर विश्वास राहिलेला नाही. नरीमन पाईंट येथील या जागेचे बाजारमूल्य ५२०० कोटी रुपये आहे पण ३४०० कोटी रुपयांचा व्यवहार करून १८०० कोटी रुपयांचे नुकसानही झाले आहे. हा व्यवहार अहंकारी, मनमानी तसेच गुन्हेगारी स्वरुपाचा असून तो तात्काळ रद्द करावा, असेही सचिन सावंत म्हणाले.

प्रदेश उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील यांनीही या संपूर्ण व्यवहाराची माहिती दिली व त्यासंदर्भातील पत्रव्यवहारही दाखवला. काँग्रेस पक्षाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नरीमन पाईंट तेथील पूर्वीच्या जागीच काँग्रेस पक्षाला कार्यालय द्यावे अन्यथा न्यायालयात धाव घेऊ असा इशारा पत्राद्वारे दिला आहे, असे गणेश पाटील म्हणाले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड गणेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष रमेश शेट्टी आदी उपस्थित होते.

Web Title: Congress has demanded that a new party office be built at nariman point

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 05:08 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Congress
  • Mumbai News
  • sachin sawant

संबंधित बातम्या

Mumbai News: महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर तब्बल 51, 582 झोपड्या, पुनर्विकास रखडला
1

Mumbai News: महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर तब्बल 51, 582 झोपड्या, पुनर्विकास रखडला

Bihar Election 2025: निवडणुकीत दोनदा मतदान करत असाल तर सावधान…? मग शिक्षेसाठी तयार राहा
2

Bihar Election 2025: निवडणुकीत दोनदा मतदान करत असाल तर सावधान…? मग शिक्षेसाठी तयार राहा

सुवर्णपदक विजेत्या सनी फुलमाळीचे चंद्रकात पाटील यांच्याकडून पालकत्व; दरमहा देणार 50 हजार रुपये
3

सुवर्णपदक विजेत्या सनी फुलमाळीचे चंद्रकात पाटील यांच्याकडून पालकत्व; दरमहा देणार 50 हजार रुपये

उमेदवारीसाठी इच्छुकांचे देव पाण्यात, नेत्यांच्या दरबारी उसळली गर्दी; पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीचा माहोल तापला
4

उमेदवारीसाठी इच्छुकांचे देव पाण्यात, नेत्यांच्या दरबारी उसळली गर्दी; पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीचा माहोल तापला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Jalna : भोकरदन नगराध्यक्षपदासाठी चार अर्ज! – भागवत कराड

Jalna : भोकरदन नगराध्यक्षपदासाठी चार अर्ज! – भागवत कराड

Nov 09, 2025 | 08:48 PM
Thane : एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिन्नर-नाशिक ग्रामीण भागात युवा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Thane : एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिन्नर-नाशिक ग्रामीण भागात युवा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Nov 09, 2025 | 08:40 PM
Crime News: वारसा नोंद करण्यासाठी लाच मागितली अन् तलाठी फसला; ACB ने थेट…

Crime News: वारसा नोंद करण्यासाठी लाच मागितली अन् तलाठी फसला; ACB ने थेट…

Nov 09, 2025 | 08:39 PM
NZ vs WI : सलग दोन टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजचा धुव्वा! न्यूझीलंडची मालिकेत आघाडी; काइल जेमिसन चमकला 

NZ vs WI : सलग दोन टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजचा धुव्वा! न्यूझीलंडची मालिकेत आघाडी; काइल जेमिसन चमकला 

Nov 09, 2025 | 08:30 PM
Jalna : मनोज जरांगे पाटील यांनी चालवला ट्रॅक्टर; रब्बी हंगामातील शेती कामांची लगबग

Jalna : मनोज जरांगे पाटील यांनी चालवला ट्रॅक्टर; रब्बी हंगामातील शेती कामांची लगबग

Nov 09, 2025 | 08:30 PM
निवेशकांसाठी सुवर्णसंधी! नव्या आठवड्यात ६ IPO उघडणार, PhysicsWallahचाही समावेश

निवेशकांसाठी सुवर्णसंधी! नव्या आठवड्यात ६ IPO उघडणार, PhysicsWallahचाही समावेश

Nov 09, 2025 | 08:27 PM
Nanded : बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न

Nanded : बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न

Nov 09, 2025 | 08:24 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Dhule : टीईटी निर्णयाविरुद्ध शिक्षक आक्रमक, सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिकेची मागणी

Dhule : टीईटी निर्णयाविरुद्ध शिक्षक आक्रमक, सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिकेची मागणी

Nov 09, 2025 | 08:14 PM
Nandurbar : नंदुरबारात शिवसैनिकांचा उत्साह, निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले

Nandurbar : नंदुरबारात शिवसैनिकांचा उत्साह, निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले

Nov 09, 2025 | 05:54 PM
Ahilyanagar : जरांगे यांच्या वक्तव्यावरून ओबीसी समाज रस्त्यावर

Ahilyanagar : जरांगे यांच्या वक्तव्यावरून ओबीसी समाज रस्त्यावर

Nov 09, 2025 | 03:52 PM
BHIWANDI : भिवंडीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश; वेतन अट रद्द

BHIWANDI : भिवंडीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश; वेतन अट रद्द

Nov 09, 2025 | 03:48 PM
Jalna : धनंजय मुंडेंची नार्को चाचणी करा ; मनोज जरांगेंची पोलिसांकडे मागणी

Jalna : धनंजय मुंडेंची नार्को चाचणी करा ; मनोज जरांगेंची पोलिसांकडे मागणी

Nov 08, 2025 | 07:46 PM
Amravati : भाजपने निवडणुकीचे रणशिंग फुंकले ; Chandrashekhar Bawankule यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Amravati : भाजपने निवडणुकीचे रणशिंग फुंकले ; Chandrashekhar Bawankule यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Nov 08, 2025 | 07:33 PM
Ashish Shelar : “महायुतीत लढण्याचा आमचा सर्वसाधारण निर्णय”

Ashish Shelar : “महायुतीत लढण्याचा आमचा सर्वसाधारण निर्णय”

Nov 08, 2025 | 03:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.