काय घडलं नेमकं
राधानगरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेळेवाडी येथील ओंकार उर्फ उदय कृष्णात बरगे व एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने तरसंबळे येथील हद्दीत जंगल परिसरामध्ये झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे एका शेतकऱ्याच्या लक्षात आले. त्याने याप्रकरणाची माहिती याची वर्दी तरसंबळेचे पोलिस पाटील गुरुनाथ कांबळे यांनी राधानगरी पोलिसांत दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चार दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याने परिसरात दुर्गंधी येत होती. त्यामुळे तेथेच शवविच्छेदन करण्यात आले. रात्री आठच्या सुमारास दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ओंकार याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.
या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ओंकार हा अतिशय कष्टाळू व मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याचा बिद्री साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर सुरू आहे. गावातील यात्रेला देवालयाच्या प्रांगणात असणारी शंभर किलोची गुंडी उचलून तो दोन तीन फेऱ्या मारत होता. त्याने असा टोकाचा निर्णय घेतल्याने आत्महत्या केली आहे.
ही तिसरी घटना
राधानगरी तालुक्यातील ही तिसरी घटना आहे. आमजाई व्हरवडे येथील दोघांनी कात्यायानी कळंबा या जंगलात पंधरा वीस वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. याची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा झाली होती. त्यानंतर तुरंबे तळाशी येथे दुसरी घटना घडली होती. त्यानंतर तरसंबळे-चोरवाडी येथे घटना घडली.
Ans: तरसंबळे (ता. राधानगरी) येथील जंगल परिसरात.
Ans: शेळेवाडी येथील 28 वर्षीय तरुण व एक अल्पवयीन मुलगी.
Ans: एकाच दोरीने झाडाला गळफास.






