पहिली घटना
सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. प्रतीक्षा तुषार कांबळे यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. सासरकडून शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. आत्महत्या प्रकरणी पती तुषार कांबळे आणि सासरा सारंग कांबळे यांच्या विरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दोघांनाही करवीर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही घटना करवीर तालुक्यातील कांडगाव येथे घडली आहे.
Kolhapur Crime: कोल्हापुरात धक्कादायक घटना! जंगलात एकाच दोरीने तरुण-तरुणीने झाडाला घेतला गळफास
दुसरी घटना
जयसिंगपूर चिपरी (ता. शिरोळ) येथील कोमल उर्फ कीर्ती या विवाहितेने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. आत्महत्या केल्याची संतापजनक घटना गुरुवारी रात्री समोर आली आहे. कीर्ती किशोर आवळे (वय २७) असे तिचे नाव आहे. मात्र, कोमलने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येला पती, सासू, दीर व भावजय जबाबदार असल्याची फिर्याद कुमार आदगोंडा कांबळे (रा. आळते, ता. हातकणंगले) यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे.पोलिसांनी पती किशोर पट्टू आवळे, सासू शोभा पट्टू आवळे, दीर अतुल पट्टू आवळे व जाऊ कोमल अतुल आवळे (सर्व रा. चिपरी, ता. शिरोळ) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
तुला मूल होत नाही…
कीर्ती आवळे हिने चिपरी येथे गुरुवारी रात्री अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची घटना घडली होती. सांगली सिव्हिल रुग्णलयात उपचार सुरु असतानां रात्री बाराच्या सुमारास तिने अखेरचा श्वास घेतला. या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलिसात झाली होती. तुला मूल होत नाही. किशोरचे दुसरे लग्न करतो असे म्हणून पतीसह सासरच्या मंडळींकडून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे फिर्याद देण्यात आली. जयसिंगपूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री पती, सासूसह चौघांना रात्री अटक केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक युनूस इनामदार करीत आहेत.
Ans: करवीर तालुका (कांडगाव) आणि जयसिंगपूर चिपरी, कोल्हापूर जिल्हा.
Ans: सासरकडून शारीरिक व मानसिक छळ.
Ans: दोन्ही प्रकरणांत पती व सासरच्या सदस्यांविरोधात गुन्हे दाखल करून अटक.






