नांदेड शहरापासून जवळच असणाऱ्या सिडको, हडको भागातील गुरुवार बाजार परिसरात राहणाऱ्या वैभवच्या यशाचे जिल्हाभरात कौतुक होत आहे. त्याचे कारण देखील प्रेरणादायी असेच आहे. दहावीत असताना वैभव पतंग उडवत होता. त्यावेळी शॉक लागल्याने त्याचे दोन्ही हाथ निकामी झाले. मात्र, आलेल्या परिस्थितीशी न डगमगता झुंज देत वैभवने पायाने लिहण्याची कला शिकून घेतली आणि आता थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले आहे. आता मात्र वैभव शिवकुमार पईतवार च्या यशाचे जिल्हाभरात कौतुक होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत घेतलेल्या परीक्षेत महसूल सहाय्यक या पदासाठी त्याची निवड झाली आहे. आज वैभवच्या या जिद्दीच्या प्रवासाचे संपूर्ण नांदेड मध्ये कौतुक होत आहे. तो केवळ स्वतःसाठीच नाही तर हजारो तरुणांसाठी एक प्रेरणा बनला आहे.