नवी मुंबईच्या सिवूड्स परिसरातील डीपीएस शाळेत ४ वर्षांच्या बालकावर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त पालकांनी शाळेसमोर शांततेत आक्रोश मोर्चा काढला. विविध राजकीय पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांवर सहआरोपी म्हणून कारवाई करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. सध्या नवी मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, शाळा प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.