पाम बीच मार्ग ते सायन–पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या आर्म उड्डाणपुलाचे लोकार्पण वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते काल पार पडले. वाशी सेक्टर 17 येथे हा लोकार्पण सोहळा पार पडला. या प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवास अधिक सुलभ होणार आहे. या उड्डाणपुलामुळे वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. या लोकार्पण सोहळ्याला महापौर सुजाता पाटील उपमहापौर दशरथ भगत अन्य नगरसेवक उपस्थित होते. नवी मुंबई शहराच्या रचनेमधील त्रुटी दूर करणारा हा प्रकल्प असल्याचे सांगत शहर अंतर्बाह्य सुंदर दिसण्यासाठी यापुढील काळात काम केले जाईल अशी ग्वाही वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.