Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : टोरंट वीज प्रकल्प रद्द करा ठाकरे गटाची मागणी; प्रांत अधिकारी, तहसीलदार यांना दिले निवेदन

. स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध केला असून आता राजकीय पक्ष देखील या प्रकल्पाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. शिवसेना ठाकरे पक्षाचे वतीने शासनाच्या विविध खात्यांना आपल्या विरोधाचे निवेदनं देण्यात आली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 03, 2026 | 02:33 PM
Karjat News : टोरंट वीज प्रकल्प रद्द करा ठाकरे गटाची मागणी; प्रांत अधिकारी, तहसीलदार यांना दिले निवेदन
Follow Us
Follow Us:
  • टोरंट वीज प्रकल्प रद्द करा ठाकरे गटाची मागणी
  • प्रांत अधिकारी, तहसीलदार यांना दिले निवेदन
कर्जत/संतोष पेरणे : तालुक्यातील ढाक आणि पोटल भागात उभारण्यात येणाऱ्या टोरंट जलविद्युत प्रकल्पाला शिवसेना ठाकरे गटाने विरोध केला आहे. स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध केला असून आता राजकीय पक्ष देखील या प्रकल्पाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. शिवसेना ठाकरे पक्षाचे वतीने शासनाच्या विविध खात्यांना आपल्या विरोधाचे निवेदनं देण्यात आली.

कर्जतमध्ये टोरंट जलविद्युत प्रकल्प विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक भूमिका घेतली आहे. कर्जत तालुक्यातील प्रस्तावित टोरंट जलविद्युत प्रकल्पाविरोधात स्थानिकांसह सर्व शेतकरी विरोधात उभे आहेत. हा प्रकल्प पाली तर्फे कोतल खलाटी, साई डोंगर, भालिवडी, ढाक बहीरी परिसरात होणार आहे.bप्रकल्पासाठी वनविभागाच्या सुमारे 600 एकर जमिनीचा वापर होणार असून काही लाख झाडांची कत्तल होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक शेतकऱ्यामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. प्रस्तावित असलेल्या टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पाविरोधात विरोधाची तीव्रता वाढत असून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Raigad News: रोह्यात धोकादायक लोखंडी कॉईल वाहतूक सुरूच; नागरिकांच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही

गुरुवारी पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी तहसीलदार, प्रांत अधिकारी, वनविभाग आणि पोलीस प्रशासनाला निवेदने देत प्रकल्प तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली. कर्जत पंचायत समिती उपसभापती चित्रा ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे वतीने निवेदन प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन दिले.यावेळी शिवसेना कर्जत तालुका प्रमुख बाजीराव दळवी,माजी उप सभापती पंढरीनाथ राऊत,युवासेनेचे संपत हडप,तसेच टोरंट प्रकल्प परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

शिवसेना पक्षाने दिलेल्या निवेदनात या प्रकल्पामुळे पाली आणि पोटल ग्रामपंचायत हद्दीतील जनजीवन विस्कळीत होणार असून विशेषतः आदिवासी लोकांचे मोठे नुकसान होईल. त्यांच्या जमिनी, उपजीविका आणि नैसर्गिक साधनसंपत्ती धोक्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यास वन्यजीवांचे स्थलांतर होऊन ते मानवी वस्तीत येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे व घरांचे नुकसान होऊ शकते. प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या वीज व पाण्याचा स्थानिकांना फायदा न होता तो इतर शहरांना पुरवठा केला जाणार असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.दरम्यान, या प्रकल्पामुळे भविष्यात कर्जत तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकल्प तात्काळ थांबवावा, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Karjat News : ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या विकासकामांना सुरुवात ; जिल्हा परिषद समिती सदस्यांचा सकारात्मक प्रतिसाद

Web Title: Karjat news thackeray group demands cancellation of torrent power project statement given to provincial officer tehsildar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • karjat news
  • latest news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

SBI खातेदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! रिवॉर्ड पॉइंट्सबाबत मोठा नियम; त्वरित करा ‘हे’ काम
1

SBI खातेदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! रिवॉर्ड पॉइंट्सबाबत मोठा नियम; त्वरित करा ‘हे’ काम

क्रिकेट मॅचदरम्यान कंडोम आणि डेटिंग Apps च्या जाहिरातींवर बंदी घाला! CTI चे ICC अध्यक्ष जय शाह यांना खळबळजनक पत्र
2

क्रिकेट मॅचदरम्यान कंडोम आणि डेटिंग Apps च्या जाहिरातींवर बंदी घाला! CTI चे ICC अध्यक्ष जय शाह यांना खळबळजनक पत्र

Mumbai Rains: साचलेल्या पाण्यातून वाट… पावसात डिलिव्हरी बॉईजची ‘अग्निपरीक्षा’! फूड- क्विक कॉमर्स कंपन्यांचा मोठा निर्णय
3

Mumbai Rains: साचलेल्या पाण्यातून वाट… पावसात डिलिव्हरी बॉईजची ‘अग्निपरीक्षा’! फूड- क्विक कॉमर्स कंपन्यांचा मोठा निर्णय

PF पेमेंट करणं झालं सोपं! IDFC FIRST Bank ला EPFO ची मान्यता; पाहा कशी आहे ऑनलाईन प्रक्रिया
4

PF पेमेंट करणं झालं सोपं! IDFC FIRST Bank ला EPFO ची मान्यता; पाहा कशी आहे ऑनलाईन प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.