Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : बिल्डरची दादागिरी अन् गृह प्रकल्पाचा मनस्ताप; सांडपाण्यामुळे शेतकऱ्यांची जमीन होतेय उद्ध्वस्त

स्थानिक पातळीवर गृह प्रकल्पमधील राहणाऱ्या निवासी वस्तीमधील सांडपाण्यामुळे शेतीचे सोडण्यात आल्याने शेती नापिकी बनली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 03, 2026 | 02:29 PM
Karjat News : बिल्डरची दादागिरी अन् गृह प्रकल्पाचा मनस्ताप;  सांडपाण्यामुळे शेतकऱ्यांची जमीन होतेय उद्ध्वस्त
Follow Us
Follow Us:

“बिल्डरची दादागिरी अन् गृह प्रकल्पाचा मनस्ताप”

सांडपाण्यामुळे शेतकऱ्यांची जमीन होतेय उद्ध्वस्त

कर्जत/संतोष पेरणे : तालुक्यातील देऊळ वाडी येथील एका बिल्डरांकडून शेतकऱ्यांच्या हक्काचा रस्ता रोखला आहे. त्याचवेळी स्थानिक पातळीवर गृह प्रकल्पमधील राहणाऱ्या निवासी वस्तीमधील सांडपाण्याची समस्या वाढली.  सांडपाणी शेतीत सोडण्यात आल्याने शेती नापिकी बनली आहे. एकीकडे हा प्रकार तर दुसरीकडे  तालुक्यातील मौजे देऊळवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वहिवाटीचा रस्ता करण्यात आला आहे. मौजे देऊळवाडी येथील शेतकरी मंगेश काशिनाथ बडेकर आणि रोहिदास हरिश्चंद्र बडेकर यांची या परिसरात वडिलोपार्जित शेतजमीन आहे.

या जमिनीवर जाण्यासाठी पिढ्यानपिढ्या बामणोली येथील स. नं. 1/2, 2/1 आणि 3/2मधून रस्ता सुरू होता. मात्र, संबंधित जमीन मालक आणि बिल्डरांनी या जागेवर संरक्षक भिंत बांधून शेतकऱ्यांचा रस्ता पूर्णपणे बंद केला आहे. बांधकाम व्यावसायिकांनी भिंत बांधून बंद केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. रस्ता अडवल्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली असून इमारतींचे सांडपाणी शेतात सोडल्याने सुपीक जमीन नापीक होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याप्रकरणी न्याय न मिळाल्यास ‘आमरण उपोषण’ करण्याचा इशारा पीडित शेतकऱ्यांनी दिला आहे.

Raigad News: रोह्यात धोकादायक लोखंडी कॉईल वाहतूक सुरूच; नागरिकांच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही

दरम्यान शेतकरी रोहिदास बडेकर यांनी “इको ग्रीन सोसायटी आणि संबंधित बिल्डरांनी रस्त्याची रुंदीही बेकायदेशीरपणे कमी केली आहे. ज्या ठिकाणी 12 मीटरचा रस्ता असायला हवा होता, तिथे केवळ 10 मीटर रस्ता ठेवला आहे. तसेच मंजूर नकाशाप्रमाणे पार्किंगची सोय न करता नियम धाब्यावर बसवले आहेत.” रस्ता मागण्यासाठी गेले असता बिल्डरांकडून दबाव टाकला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. रस्ता नसल्यामुळे ट्रॅक्टर, नांगर आणि इतर शेतीची अवजारे शेतात नेणे अशक्य झाले आहे. यामुळे सध्याच्या हंगामातील मशागतीची कामे रखडली आहेत. इमारतींमधील सांडपाणी थेट भातशेतीत सोडले जात आहे. यामुळे उभ्या पिकाचे नुकसान होत असून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. याप्रकरणी शेतकरी मंगेश बडेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि कर्जत तहसीलदार , यांच्याकडे रीतसर अर्ज केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने या अर्जाची दखल घेत तहसीलदारांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अद्याप प्रत्यक्ष निकाल न लागल्याने शेतकऱ्यांनी आता पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायतीचे न्यायासाठी दरवाजे ठोठावले आहेत.

Karjat News : ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या विकासकामांना सुरुवात ; जिल्हा परिषद समिती सदस्यांचा सकारात्मक प्रतिसाद

Web Title: Farming in deol wadi is infertile due to sewage discharge in karjat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • navrashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

India-Russia Deal : भारताची रशियाला महाऑफर! रशियन जमिनीवरून करणार गेम चेंज?  नेमका काय प्लॅन?
1

India-Russia Deal : भारताची रशियाला महाऑफर! रशियन जमिनीवरून करणार गेम चेंज? नेमका काय प्लॅन?

India-US Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार कराराचा पहिला टप्पा जुलैमध्ये पूर्ण होणार; पीयूष गोयल यांची महत्त्वपूर्ण विधान
2

India-US Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार कराराचा पहिला टप्पा जुलैमध्ये पूर्ण होणार; पीयूष गोयल यांची महत्त्वपूर्ण विधान

LPG Price Hike: झटका बसणार… LPG सिलेंडर आणखी महागणार, केंद्र सरकारने कारण देत थेटच सांगितलं
3

LPG Price Hike: झटका बसणार… LPG सिलेंडर आणखी महागणार, केंद्र सरकारने कारण देत थेटच सांगितलं

SBI Chairman Statement : ‘केवळ Sensex कडे पाहू नका…’ SBI अध्यक्षांचा गुंतवणूकदारांना मोलाचा सल्ला
4

SBI Chairman Statement : ‘केवळ Sensex कडे पाहू नका…’ SBI अध्यक्षांचा गुंतवणूकदारांना मोलाचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.