पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता कराबाबत गेल्या काही वर्षापासून शास्ती माफी ची मोठ्या प्रमाणात मागणी केली जात होती. आता पनवेल महानगरपालिका आयुक्तांनी शास्ती माफीचा निर्णय घेतला आहे, या निर्णयामुळे पनवेल मधील नागरिकांना दिलासा मिळत आहे. शास्ती माफीचा निर्णयाचे संपूर्ण महायुतीकडून स्वागत केले जात आहेयाच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत निर्याचे स्वागत केले. तसेच या पत्रकार परिषदेत रामदास शेवाळे असे म्हटले की आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शास्ती माफीसाठी पाठपुरावा केला त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु दुसरीकडे भाजप नेते अस म्हणतात की शास्ती माफीचा निर्णय भाजपा कडून घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता शास्ती माफीचा निर्णयावरून पनवेल मध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपा मध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे.