राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात अंतर्गत मतभेद असल्याचे स्पष्ट संकेत दिसतं आहेत. पक्षाचे नेते आणि पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षात एका गटाने थेट अजित पवार गटासोबत युती करावी, यासाठी जोरदार आग्रह धरला आहे. पुण्यातील राजकीय वर्तुळात सध्या मोठी चर्चा आहे की, पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मांडलेल्या भूमिकेला पक्षातूनच विरोध होत आहे. या विरोधाचे मुख्य कारण म्हणजे, पक्षातील एक गट आगामी निवडणुकांमध्ये राजकीय फायदा लक्षात घेऊन अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्यासाठी आग्रही आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी या अंतर्गत संघर्षावर भाष्य केले. ते म्हणाले की, शनिवारी रात्री पक्षाची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत एक ठराव करण्यात आला की, पुणे शहराचा अंतिम निर्णय हा शरद पवार साहेब, सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांना असेल. “पवार साहेब जो काही अंतिम आदेश देतील, तोच अंतिम असेल,” असे तांबे यांनी स्पष्ट केले. या भूमिकेतून त्यांनी निर्णय घेण्याचा अधिकार केवळ पक्षश्रेष्ठींना असल्याचे सांगितले आहे. तांबे यांनी या गोष्टीला दुजोरा दिला की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील एक गट अजित पवारांसोबत युतीसाठी आग्रही आहे. असे दिसून आले आहे. त्यामुळे शरद पवार आता काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांच लक्ष लागले.
.