Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खासदारानंतर आता आमदारांचं ‘ऑपरेशन टायगर’? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला चार आमदारांची दांडी

बैठकीत सरकारविरोधातील रणनीती, जनहिताचे प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडणे तसेच आगामी राजकीय वाटचालीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 23, 2026 | 01:45 PM
खासदारानंतर आता आमदारांचं 'ऑपरेशन टायगर'? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला चार आमदारांची दांडी

खासदारानंतर आता आमदारांचं 'ऑपरेशन टायगर'? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला चार आमदारांची दांडी

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना (ठाकरे गट) ला एकामागून एक धक्के बसत असताना आता आमदारांमध्येही संभाव्य फुटीच्या चर्चांना वेग आला आहे. पक्षाचे सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दाखल झाल्याच्या घडामोडींनंतर राजकीय वातावरण अधिक तापले आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवालय येथे सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली. मात्र, या बैठकीला चार आमदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या या बैठकीस विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदारांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली होती. बैठकीत सरकारविरोधातील रणनीती, जनहिताचे प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडणे तसेच आगामी राजकीय वाटचालीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस सुनील प्रभू, भास्कर जाधव, अनिल परब, सचिन अहिर यांच्यासह बहुतांश आमदार उपस्थित होते. भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात अलीकडे झालेल्या वादानंतरही दोघांची उपस्थिती संघटनात्मक एकात्मतेचा संदेश देणारी मानली जात आहे.

सुरुवातीला तीन आमदार अनुपस्थित असल्याची चर्चा होती; मात्र नंतर चार नावे समोर आली. संजय देरकर, राहुल पाटील, संजय पोतनीस आणि सुनील शिंदे हे आमदार बैठकीस गैरहजर राहिल्याचे सांगितले जात आहे. या अनुपस्थितीमुळे राजकीय तर्क-वितर्वांना उधाण आले असले तरी पक्षाने कोणतीही बंडखोरी नसल्याचे स्पष्ट केले आहे.

आमदारांना विशेष सूचना

उद्धव ठाकरे हे प्रत्येक अधिवेशनापूर्वी आमदारांची बैठक घेऊन सभागृहात मांडावयाच्या मुद्द्यांबाबत मार्गदर्शन करतात. यावेळी खासदारांच्या बंडामागे निधीअभावाचा मुद्दा पुढे आल्याने त्यावर तसेच आमदारांच्या स्थानिक अडचणींवरही बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.

खासदारांच्या बंडानंतर ‘डॅमेज कंट्रोल’

ही बैठक अशा वेळी झाली, जेव्हा काही अंतरावर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ठाकरे गटातील सहा खासदारांच्या शिंदे गटात प्रवेशाची औपचारिक प्रक्रिया सुरू होती. या घडामोडींमुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर पक्ष संघटना एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा, संघटन बळकटीकरण आणि कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवून ठेवण्याबाबत चर्चा झाली.

ठाकरे गटाकडून स्पष्टीकरण

पक्षाच्या माहितीनुसार, संजय देरकर आणि सुनील शिंदे हे पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे आपल्या मतदारसंघात व्यस्त होते. राहुल पाटील हे परभणी विधान परिषद निवडणुकीसंदर्भातील प्रक्रियेत सहभागी असल्याने बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तर संजय पोतनीस यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पक्षाचा दावा आहे की, १७ विधानसभा आमदारांपैकी बहुतांश तसेच विधान परिषदेतील सर्व सदस्य बैठकीला उपस्थित होते.

‘ऑपरेशन टायगर फत्ते; चौकार नाही, थेट षटकार, २०२९ साली सहाच्या सहा खासदार पुन्हा निवडून येणार,’ एकनाथ शिंदेंची ग्वाही

Web Title: Four mlas absent in uddhav thackerays meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
1

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
2

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
3

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल
4

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.