Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati News : बारामती नगर परिषदेचा निर्णय; 3.5 एकर जागेत उभारणार अजितदादा पवार स्मारक

बारामती नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अजितदादा पवार यांच्या नावाने 3.5 एकर जागेत भव्य स्मारक उभारण्याच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. सभागृहातील सदस्यांनी बारामती, पुणे जिल्हा आणि महाराष्ट्राच्या विकासातील त्यांच्या योगदानाचा गौरव करत हे स्मारक भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरावे, अशी भावना व्यक्त केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 23, 2026 | 06:18 PM
बारामती नगर परिषदेचा निर्णय; 3.5 एकर जागेत उभारणार अजितदादा पवार स्मारक

बारामती नगर परिषदेचा निर्णय; 3.5 एकर जागेत उभारणार अजितदादा पवार स्मारक

Follow Us
Follow Us:
  • बारामतीत अजितदादांच्या भव्य स्मारकास एकमताने मंजुरी
  • ३.५ एकर जागेत उभारणार जागतिक दर्जाचे प्रेरणास्थळ
  • बारामतीत उभारणार प्रेरणादायी स्मारक
बारामती: बारामती नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ३.५ एकर जागेत भव्य स्मारक उभारण्याच्या प्रस्तावास एकमताने मंजुरी देण्यात आली. सभागृहात सर्व सदस्यांनी दादांच्या बारामती, पुणे जिल्हा आणि महाराष्ट्राच्या विकासातील अतुलनीय योगदानाचा गौरव करत हे स्मारक भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरावे, अशी भावना व्यक्त केली.

यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव यांनी प्रस्तावाची माहिती देताना स्मारकाच्या संकल्पनेबाबत सविस्तर माहिती दिली. दादांच्या दूरदृष्टीची आठवण सांगताना त्यांनी भावूक होत सांगितले की, याच ठिकाणी उंच मनोरा उभारून विकसित झालेली बारामती नागरिकांना पाहता यावी, असा दादांचा मानस होता. मात्र, नियतीच्या क्रूर खेळामुळे आज त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. दादांचे स्वप्न, त्यांची विकासदृष्टी आणि जनतेशी असलेले नाते कायम स्मरणात राहावे, यासाठी हे स्मारक उभारले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

Baramati fire News : वडगाव निंबाळकरमध्ये भंगार दुकानाला भीषण आग; ग्रामस्थांनी वाचवली घरे

सभागृहातील चर्चेदरम्यान नगरसेवक नवनाथ बल्लाळ यांनी दादांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे, दर्जेदार आणि भव्य स्मारक उभारण्यात यावे, असे मत व्यक्त केले. नगरसेवक अमर धुमाळ यांनी दादांची कीर्ती, विकासदृष्टी आणि कार्याचा गौरव करत स्मारक प्रेरणादायी स्वरूपाचे असावे, असे सांगितले. नगरसेवक सोमनाथ गजकस यांनी हे स्मारक जागतिक दर्जाचे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली, तर नगरसेवक गणेश जोजारे यांनी दादांच्या कार्याच्या उंचीला साजेसे स्मारक उभारण्यात यावे, असे मत मांडले. नगरसेवक जय पाटील यांनी दादांप्रती असलेले जनतेचे प्रेम अधोरेखित करत, असे भव्य स्मारक बारामतीत उभारले जाणे ही संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.दरम्यान, नगरसेवक अमोल कावळे यांनी या प्रस्तावाला पूर्ण पाठिंबा देत, स्व. अजितदादा पवार यांचे संपूर्ण आयुष्य सामान्य माणसासाठी समर्पित होते. त्यामुळे त्यांचे स्मारकही सर्वसामान्य नागरिकांसाठी कायम खुले आणि निःशुल्क असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. दादांनी आयुष्यभर जनतेसाठी आपले दरवाजे खुले ठेवले होते, त्यामुळे त्यांच्या स्मारकासाठी येणाऱ्या दादाप्रेमी आणि नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारू नये, हीच त्यांना वाहिलेली खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

तसेच, स्मारकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जीवनप्रवासाचा आणि विविध क्षेत्रातील कार्याचा माहितीपट व चलचित्रांच्या माध्यमातून प्रभावीपणे आढावा सादर करण्यात यावा, अशी सूचनाही सदस्यांनी केली. त्यांच्या सार्वजनिक जीवनाशी निगडित महत्त्वपूर्ण वस्तू, वापरातील साहित्य, छायाचित्रे, दस्तऐवज, सन्मानचिन्हे आणि ऐतिहासिक आठवणींचा संग्रह करून तेथे संग्रहालय उभारण्यात यावे, जेणेकरून पुढील पिढ्यांना दादांच्या कार्याची ओळख होऊन त्यातून प्रेरणा मिळेल, असे मत व्यक्त करण्यात आले.

सभागृहातील सर्व सदस्यांनी एकमुखाने ठरावास मंजुरी देत, हे स्मारक केवळ स्मृतीस्थळ न राहता स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारांचा, विकासदृष्टीचा आणि जनसेवेच्या वारशाचा जिवंत दस्तऐवज ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. बारामतीच्या प्रगतीचा शिल्पकार म्हणून ओळख असलेल्या दादांच्या कार्याची चिरंतन स्मृती जपणारे हे स्मारक भविष्यात बारामतीच्या वैभवात भर घालणारे आणि लाखो नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणारे नवे केंद्र ठरणार असल्याची भावना सभागृहात व्यक्त करण्यात आली.

वादग्रस्त वक्तव्यावेळी गप्प, आता स्मारकासाठी पुढे का?

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मारक उभारणीच्या विषयावर बारामती नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा रंगली असताना, या विषयावर बोलण्यासाठी आणि सूचक होण्यासाठी नगरसेवकांमध्ये चढाओढ सुरू असल्याचे चित्र दिसून आले. मात्र याच पार्श्वभूमीवर नगरसेवक तथा आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ यांनी काही नगरसेवकांच्या भूमिकेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्रमक भूमिका घेतली.

बल्लाळ यांनी सभागृहात बोलताना म्हटले की, अजितदादा पवार यांच्याविरोधात पूर्वी वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले होते. त्या वेळी अजितदादांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहण्यासाठी फार कमी जण पुढे आले होते. त्या प्रसंगी केवळ नगरसेवक अमर धुमाळ आणि विशाल हिंगणे यांनी भूमिका घेतली होती. मात्र आज स्मारकाच्या विषयावर पुढाकार घेण्यासाठी अनेक जण पुढे येत असल्याचे दिसत आहे. यावेळी त्यांनी विरोधी पक्षातील नगरसेविका आरती शेडगे तसेच इतर नगरसेवकांनाही थेट प्रश्न विचारला. “जेव्हा अजितदादांबाबत वादग्रस्त वक्तव्य झाले होते, तेव्हा तुम्ही गप्प का बसला होतात? त्या वेळी त्यांचा सन्मान राखण्यासाठी आवाज का उठवला नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

स्मारक उभारणीसाठी सूचक होण्याची स्पर्धा सुरू असताना, केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी काही जण पुढाकार घेत असल्याचा आरोपही बल्लाळ यांनी केला. अजितदादांप्रती खरी निष्ठा कृतीतून दिसली पाहिजे, केवळ सभागृहातील भाषणातून नव्हे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बल्लाळ यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात काही काळ वातावरण तापले.

ST Bus Fire : नीरा-बारामती मार्गावर एसटी बसला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

Web Title: Baramati municipal council approves proposal for ajitdada pawar memorial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
2

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
3

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.