Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • HSC Exam 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Narsapur Case : नसरापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी सराईत

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या नसरापूर येथील अत्याचार प्रकरणातील आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपीला ७ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.​

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 02, 2026 | 08:00 PM

Follow Us

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या नसरापूर येथील अत्याचार प्रकरणातील आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपीला ७ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.​ आज सुनावणीला सुरुवात होताच न्यायालयाने आरोपीला त्याचे नाव विचारले आणि त्याला कोणत्या कारणास्तव अटक करण्यात आली आहे, याची खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांनी न्यायालयात रिमांड रिपोर्ट सादर केला. या रिमांड रिपोर्टवर आरोपीची स्वाक्षरी घेण्यात आली. न्यायालयाने संपूर्ण रिमांड कॉपीचे सखोल वाचन केल्यानंतर पोलिसांनी तपासासाठी आरोपीच्या कोठडीची मागणी केली. या गुन्ह्यात अजून काही महत्त्वाचे पुरावे गोळा करायचे असून आरोपीकडून अधिक तपास करणे बाकी असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला ७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.​दरम्यान, सुनावणी संपवून पोलीस जेव्हा आरोपीला घेऊन बाहेर पडत होते, तेव्हा न्यायालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते अनिकेत देशमाने आणि अर्चना शहा यांनी पोलिसांची गाडी अडवत आरोपीचा तीव्र निषेध केला. “महिलांनी अशा प्रकारचे अत्याचार अजून किती दिवस सहन करायचे?” असा संतप्त सवाल उपस्थित करत कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला. काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला करत आरोपीला घेऊन रवाना झाले.

Close

Follow Us:

Web Title: Pune narsapur case accused in nasrapur atrocity case in sarait

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

पुण्यात पहिल्याच दिवशी 8 हजारांहून अधिक नागरिकांची स्व-गणना
1

पुण्यात पहिल्याच दिवशी 8 हजारांहून अधिक नागरिकांची स्व-गणना

पुण्यातील गंगाधाम रस्त्यावर मध्यरात्री गॅस गळती, 24 जणांना त्रास; नागरिकांची मोठी धावपळ
2

पुण्यातील गंगाधाम रस्त्यावर मध्यरात्री गॅस गळती, 24 जणांना त्रास; नागरिकांची मोठी धावपळ

पुणे महापालिकेचा आणखी एक डांबर मिक्स प्रकल्प; येरवड्यातील प्लांटवरील ताण कमी होणार
3

पुणे महापालिकेचा आणखी एक डांबर मिक्स प्रकल्प; येरवड्यातील प्लांटवरील ताण कमी होणार

पुणे जिल्हा परिषदेचा ‘सुपर निपुण’ शाळांकडे प्रवास; 200 गावांत ‘समर कॅम्प’चा शुभारंभ
4

पुणे जिल्हा परिषदेचा ‘सुपर निपुण’ शाळांकडे प्रवास; 200 गावांत ‘समर कॅम्प’चा शुभारंभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.